सिल्व्हर बॉय रवीकुमारवर बक्षिसांचा वर्षाव, क्लास वन नोकरी, 4 कोटी रुपये, आणखी...

टोकिया ऑलिम्पिकमधल्या कामगिरीनंतर देशभरातून रवीकुमारचं कौतुक, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि क्रीडामंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Updated: Aug 5, 2021, 06:48 PM IST
 सिल्व्हर बॉय रवीकुमारवर बक्षिसांचा वर्षाव, क्लास वन नोकरी, 4 कोटी रुपये, आणखी... title=

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू रवी कुमारने ऐतिहासिक कामगिरी करत सिल्व्हर मेडलची कमाई केली. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या मल्लाने रवीकुमारवर निसटता विजय मिळवला. रवीकुमारला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं असलं तरी त्याच्या दमदार कामगिरीची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे.

आपलं पहिलंच ऑलिम्पिक खेळणाऱ्या 23 वर्षीय रवीकुमारचं देशभरात कौतुक होत आहे. करोडो भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. रवीकुमारच्या या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कौतुक केलं आहे. तर हरियाणा सरकारने रवीकुमारवर बक्षिसांचा वर्षावच केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट

टोकियो ऑलिम्पिकमधल्या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन रवीकुमार दहियाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे ' रवी कुमार दहिया एक उत्कृष्ट कुस्तीपटू! त्याची लढाऊ वृत्ती आणि दृढता वाखाण्याजोगी आहे. #TOKYO OLYMPIC 2020 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याच्या कर्तृत्वाचा भारताला मोठा अभिमान आहे.

राष्ट्रपतींकडून कौतुक

राष्ट्रपाती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करत रवीकुमार दाहियाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. '#TOKYO OLYMPIC 2020 मध्ये रौप्य जिंकल्याबद्दल भारताला रवी दहियाचा अभिमान आहे. आव्हानात्मक परिस्थितीतून एखाद्या लढवय्या सारखा तू लढलास, तुझ्या अंर्तमनातील ताकद दाखवून दिलीस. भारताला गौरव मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन'

क्रीडा मंत्र्यांकडून कौतुक

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत म्हटलं आहे ' मी रवी दहिया यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच आपल्या ही संधी मिळाली. खेळ म्हणून करियर करणाऱ्यांसाठी तो प्रेरणास्त्रोत आहे'

हरियाणा सरकारकडून बक्षिसांचा वर्षाव

मुळचा हरयाणाचा असलेल्या रवीकुमार दहियावर हरियाणा सरकारने तर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. हरयाणा सरकारनं रवी कुमारच्या कामगिरीवर अभिमान असल्याचं सांगत रवी कुमारला क्लास वन नोकरी, हरयाणा इथं ५० टक्के सवलतीत जमिनीसह त्याच्या नाहरी गावी कुस्तीसाठी इन्डोअर स्टेडियम बांधण्यास परवानगी दिली आहे. शिवाय रौप्यपदक जिंकल्यामुळे 4 कोटींच्या बक्षीसाचीही घोषणा केली आहे. 

मुंबई पोलिसांकडून ट्विट

मुंबई पोलिसांनीही ट्विट करत 'उगवत्या सुर्याच्या देशात चमकला भारताचा सुपुत्र' असं म्हणत रौप्य पदक विजेता रवी दहिया चे ट्विटद्वारे कौतुक केलं आहे.