Shubman Gill and Abhishek Nair: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला न्हवता. पर्थमधील हा सामना टीम इंडियाने खूप गुणांनी जिंकला होता. शुभमनच्या जागी देवदत्त पडिक्कलला खेळायला संधी मिळाली. परंतु या संधीचे सोने करायला अपयशी ठरला. आता शुभमन गिल तंदुरुस्त असून ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकणार आहे. याआधी तो संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी स्पर्धा करताना दिसला. याचाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शुभमन गिल प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची आशा बळावली आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी गिलला दुखापत झाली होती, त्यामुळे संघाची चिंता वाढली होती. त्याच्या अनुपस्थितीतही टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता.
हे ही वाचा: IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधन
ॲडलेडमधील सामन्यापूर्वी टीम इंडियाने कॅनबेरामध्ये पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळला. पहिल्या दिवसाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान, शुभमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यात चुरशीची टक्कर झाली.दोघांनी ५० यूएस डॉलर्स म्हणजेच सुमारे ४२०० रुपयांची पैजही लावली.
हे ही वाचा: बीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!
कॅनबेरामध्ये दोघांनाही चेंडूने एकच स्टंपवर हिट करायचं असा सामना ठरला. बीसीसीआयने याचा मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. फील्डिंग कोच टी दिलीप यांनी दोघांसमोर हे आव्हान ठेवले होते. स्टंपला मारण्यापूर्वी, मी 50 यूएस डॉलरची पैज लावत आहे की गिलला चेंडूने स्टंपला मारता येणार नाही, असे नायर म्हणाला. टी दिलीपने दोघांना तीन संधी दिल्या. नायर आणि गिल प्रत्येकी एकदा फटकेबाजी करण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे, टी दिलीपने एका झटक्यात स्टंपला धडक दिली. तो टीम इंडियाचा फिल्डिंग कोच का आहे हे त्याने सिद्ध केले.