Shubhman Gill Century: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात आयपीएलचा क्वॉलिफारचा दुसरा सामना (Qualifier 2) खेळवला जाणार आहे. क्वालिफायर 2 मॅचचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात गुजरातच्या सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने नावाप्रमाणे मोठा पराक्रम दाखवला आहे. या सामन्यात शुभमनने धमाकेदार सेंच्युरी ठोकली आहे. शुभमनच्या या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर गुजरातने डोंगराएवढा स्कोर उभा केलाय. (Shubhman Gill hit third Century in MI vs GT Qualifier 2 IPL 2023)
आयपीएल 2023 मधील शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यापूर्वी गिलने सनरायझर्स हैदराबाद आणि रॅायल चॅलेंजर बंगळूरू यांच्याविरूद्ध शतक झळकावलं होतं. बंगळुरूविरुद्ध शुभमनने आक्रमक खेळी करून मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळवून दिलं होतं. मात्र, आता शुभमनने याच मुंबईविरुद्ध दमदार शतक ठोकलंय. मुंबईनेविरुद्ध गुजरात टायटन्सच्या फलंदाजीची सुरु झाली होती. 5 ओव्हर्समध्ये 38 रन्स पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर शुभमनने पुढचा घेअर टाकला आणि वादळी शतक ठोकलंय.
Stand and applaud the Shubman Gill #TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI | @ShubmanGill pic.twitter.com/ADHi0e6Ur1
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वॉलिफार सामन्यात गुजरातचा पराभव केला होता. त्यामुळे आता चेन्नई थेट फायनलमध्ये पोहोचली आहे. अशातच आता आजच्या सामन्यात जिंकणारी टीम चेन्नईशी फायनलमध्ये भिडणार आहे. त्यामुळे आता मुंबई जिंकणार की गुजरात (Gujarat Titans vs Mumbai Indians) हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुधारसन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
इशान किशन (w), रोहित शर्मा (क), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.