कराची : पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळण्याचे आमंत्रण भारतीय क्रिकेटर्सला द्यायला हवे. आफ्रिदीने लाहोरमध्ये आपल्या फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. तो म्हणाला पण मला माहिती की भारतीय खेळाडूंचा करार त्यांना परदेशातील टी-२० खेळण्याची मंजुरी देत नाही.
तो म्हणाला, भारतीय खेळाडूंचा करार असला तरी त्यांना कमीत कमी पीसीएलमध्ये खेळण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. मला माहिती आहे हे खूप कठीण आहे. कारण ते फक्त इंडियन प्रीमिअर लीगच खेळू शकतात. पण त्यांना पीसीएलसाठी आमंत्रित करायला हवे.
आफ्रिदीने या गोष्टीवर जोर दिला की पीएसएलमध्ये परदेशी खेळाडूंना जास्तजास्त बोलविल्याने द्विपक्षीय सिरीज ही पाकिस्तानात सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल. भारतने २००८ पासून पाकिस्तानाशी द्विपक्षीय सिरीज खेळली नाही. काही दिवसापूर्वी आफ्रिदीने भारतीय कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा करत त्याला आपला मित्र म्हटले होते.
आफ्रीदी म्हणाला विराट आणि माझे संबंध राजकीय परिस्थितीवर निर्भर नाही आहेत. विराट शानदार व्यक्ती आहे. माझ्याप्रमाणे तो त्याच्या देशाचा क्रिकेट दूत आहे.
आफ्रिदी म्हणाला, की विराट मला नेहमी अधिक सन्मान देतो. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने म्हटले की मी मानतो की क्रिकेटर म्हणून आमच्यात जसे संबंध आहेत त्यातून आम्ही एक उदाहरण देऊ शकतो की दोन्ही देशात कसे संबंध हवेत. मला वाटते की मला पाकिस्ताननंतर सर्वात जास्त प्रेम आणि सन्मान भारत आणि ऑस्ट्रेलियात मिळाला आहे.