मुंबई : जर तुम्हाला असे वाटतेय की निदहास ट्रॉफी स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश यांच्यातील अखेरचा सामना रोमांचक ठरला. तर कदाचित तुम्हाला तुमच्या मेंदूवर जोर द्यावा लागेल.दोन वर्षांपूर्वी २३ मार्च २०१६मध्ये बंगळुरुमध्ये झालेल्या वर्ल्डकप टी-२० स्पर्धेतील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले होते. अखेरच्या ३ चेंडूत बांगलादेशला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. मात्र भारताने बांगलादेशला त्या २ धावा करु दिल्या नाहीत आणि भारताने हा सामना जिंकला. हा सामनाही क्रिकेट इतिहासातील रोमांचक सामना मानला जातो.
दोन वर्षांपूर्वी बंगळूरुच्या मैदानावर टी-२० वर्ल्डकपचा सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ विकेट गमावताना १४६ धावा केल्या. यात सुरेश रैनाने सर्वाधिक २३ चेंडूत ३० धावा केल्या. १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या विकेट ठराविक अंतराने पडत गेल्या. टीमने ६ विकेट गमावताना १९व्या षटकांपर्यंत १३६ धावा केल्या होत्या. क्रीझवर मुशफिकर रहीम आणि महमदुल्लाह खेळत होते. अखेरच्या षटकांत बांगलादेशला केवळ ११ धावा करायच्या होत्या. बांगलादेश हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हार मानायला तयार नव्हता.
पांड्याच्या पहिल्या बॉलवर महमदुल्लाहने जोरदार शॉट मारला. यावर एक रन काढला.
आता बांगलादेशला ५ चेंडूत १० धावांची गरज. पांड्याच्या दुसऱ्या बॉलवर मुशफिकरने चौकार ठोकला.
पांड्याच्या तिसऱ्या बॉलवर रहीमने आणखी एक चौकार ठोकला. सलग दोन चौकार ठोकल्यानंतर विजय बांगलादेशच्या दृष्टिपथात होता. यावेळी टीम इंडियाचे चाहते टेन्शनमध्ये होते.
आता बांगलादेशला ३ चेंडूत २ रन हवे होते. अति आत्मविश्वासाच्या जोरावर रहीमने तिसऱ्या बॉलवर पुन्हा बाऊंड्रीला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र धवनने तो कॅच अलगद टिपला. बांगलादेशने सातवा विकेट गमावला.
बांगलादेशला आता दोन बॉलवर दोन रन हवे होते. पुढच्याच चेंडूवर महमदुल्लाहने रिस्की शॉट खेळला आणि रवींद्र जडेजाने शानदार कॅच घेत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.
आता सामना काही प्रमाणात भारताच्या बाजूने झुकला होता. सामन्यातील अखेरच्या बॉलवर बांगलादेशला दोन रन्सची गरज होती. सुवगाताने पांड्याने टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटला लागलाच नाही. बॉल धोनीकडे गेला. सुगवाता धाव घेण्यासाठी क्रीझवर धावला. मात्र त्याआधीच धोनीने वाऱ्याच्या वेगाने स्टंप आऊट केले आणि भारतीय फॅन्सचा जल्लोष सुरु झाला..