Shah Rukh Khan : कोलकाताच्या पराभवानंतर थेट ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला किंग खान, मॅन्टॉर गंभीरला काय बोलला? पाहा Video

KKR Dressing Room Video : राजस्थानविरुद्ध हातातील सामना गमावल्यानंतर कोलकाताचा मालक शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये गेला अन् काय काय म्हणाला पाहा...

सौरभ तळेकर | Updated: Apr 17, 2024, 04:29 PM IST
Shah Rukh Khan : कोलकाताच्या पराभवानंतर थेट ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला किंग खान, मॅन्टॉर गंभीरला काय बोलला? पाहा Video title=
Shah Rukh Khan speech in the KKR dressing room

Shah Rukh Khan speech in KKR dressing room : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बटलरने कोलकाताच्या तोंडातून विजय हिसकावून घेतला. अखेरच्या 5 ओव्हरपर्यंत सामना कोलकाताच्या बाजूने होता. मात्र, बटलरने (Jos Buttler) एकहाती सामना फिरवला अन् कोलकाताला पराभवाचं पाणी पाजलं. अखरेच्या तीन ओव्हरमध्ये बटलरने 40 धावा कुटल्या तर 6 अतिरिक्त धावा राजस्थानला मिळाल्या. त्यामुळे कोलकाताला पराभव पत्कारावा लागलाय. हाती आलेला पराभव स्विकारावा लागल्याने शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) निराश दिसत होते. सामन्यानंतर मात्र किंग खानने थेट केकेआरच्या ड्रेसिंग रुममध्ये (KKR dressing room) एन्ट्री केली अन् भाषण केलं.

काय म्हणाला शाहरुख खान?

आजच्या सामन्यात आपण नक्कीच पराभवास पात्र नव्हतो. पण आपण नक्कीच सर्वांनी चांगला खेळ केला. आपल्या कामगिरीबद्दल अभिमान वाटायला हवा. त्यामुळे कुणीही निराश होण्याची गरज नाहीये. कोणीही दु:खी होऊ नका. आपण चांगला खेळ केलाय. त्यामुळे आनंदी रहा. जेव्हा आपण ड्रेसिंग रुममध्ये येतो, तेव्हा मनोधैर्य उंचावलेलं असलं पाहिजे, असं म्हणत शाहरुख खानने खेळाडूंचा आत्मविश्वास राखण्याचा प्रयत्न केला.

आपण सध्या टॉपवर आहोत आणि आपण ती टॉप पोसिशन राखण्याचा प्रयत्न करु. तुम्ही मैदानात जी उर्जा दाखवली, ती कायम राखण्याचा प्रयत्न करू. तुमचं व्यक्तीगत खेळाडील उर्जा देखील कायम ठेवा. टीममधील आपापसातील संबंध चांगले राहु द्या. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा... आज जसा खेळ दाखवला, तो खरंच अभिमानास्पद होता. मी इथं कोणाचं नाव घेत नाहीये, पण सर्वांनी उत्तम खेळ केला, असं शाहरुख खान म्हणतो. त्यावेळी त्याने मेंटॉर गंभीरला खास सल्ला दिला. 

जीजी (गौतम गंभीर) तू निराश होऊ नकोस, आपण पुन्हा कमबॅक करू, असं शाहरुख म्हणतो. जणू काही गंभीर या पराभवानंतर खेळाडूंची शाळा घेणार हे शाहरुखला माहित होतं. त्यावर गंभीर देखील हसताना दिसतोय. गंभीरचा खेळाच्या बाबतीत किती शिस्तप्रिय आहे, याची जाण शाहरुखला होती. त्यामुळे त्याने गौतमला कुल करण्याचा प्रयत्न केला.

पाहा Video

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.