Urvashi Rautela: उर्वशी स्टेजवर आली अन् सुरू झाल्या ऋषभ पंतच्या घोषणा, त्यानंतर जे काही झालं...पाहा Video

Urvashi Rautela Video - विशाखापट्टणम येथे झालेल्या 'वॉल्टेअर वीरैया' चित्रपटाच्या (Waltair Veerayya) मेगा पार्टीसाठी उर्वशी रौतेला आली होती. उर्वशी भाषण देण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं. त्यावेळी...

Updated: Jan 12, 2023, 06:15 PM IST
Urvashi Rautela: उर्वशी स्टेजवर आली अन् सुरू झाल्या ऋषभ पंतच्या घोषणा, त्यानंतर जे काही झालं...पाहा Video title=
Urvashi Rautela,Rishabh Pant,

Urvashi Rautela Rishabh Pant: भारतीय संघाचा (Team India) स्टार अष्टपैलू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यातील नात्याविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा होताना दिसतात. ऋषभ पंतच्या कारचा भीषण (Car Accident) अपघात झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल करण्यास सुरूवात केली. अशाच काहीसा प्रकार पहायला मिळाला. त्यामुळे मोठा वादंग माजण्याची शक्यता आहे. (seeing urvashi rautela on stage people started shouting rishabh pant name marathi news watch video)

नेमकं काय झालं?

विशाखापट्टणम येथे झालेल्या 'वॉल्टेअर वीरैया' चित्रपटाच्या (Waltair Veerayya) मेगा पार्टीसाठी उर्वशी रौतेला आली होती. उर्वशी भाषण देण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं. उर्वशी स्टेजवर पोहोचताच तिला पाहून लोकांनी ऋषभ पंतच्या नावाच्या घोषणा (People Started Shouting Rishabh Pant Name) सुरू केल्या. मात्र, गर्दीकडे दुर्लक्ष करून उर्वशीने आपलं भाषण सुरूच ठेवलं. यावेळी बोलताना उर्वशीने सुपरस्टार चिरंजीवीचं (Chiranjeevi) कौतुक केलंय.

आणखी वाचा - Urvashi Rautela : ऋषभ पंत याला पाहण्यासाठी उर्वशी रौतेला रुग्णालयात पोहोचली! शेअर केला फोटो

उर्वशीने कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया न देता परिस्थिती समजदारीने हाताळल्याने तिचं सध्या कौतुक होताना दिसत आहे. ऋषभ पंतच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून उर्वशीने तिचं बोलणं चालू ठेवलं. त्यानंतर सर्वांचं लक्ष उर्वशीच्या बोलण्याकडे गेलं आणि घोषणा बंद झाल्या. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा Video - 

दरम्यानस, उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि 'आरपी'मधील (RP) गोंधळ सर्वांना माहिती आहे. उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्याबाबत यापूर्वी बरीच चर्चा झाली होती. अशातच मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यात काहीच नसल्याचं दोघांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा सतत होताना दिसते.