सचिन तेंडुलकरची खोडकर वृत्ती! या क्रिकेटपटूच्या रूममध्ये भरलं पाणी

या खेळाडू दुपारी झोपलेला सचिनला पाहावलं नाही. त्याला मात्र खेळायचं होतं त्यामुळे एक दोन नाही तर रूम भरेल एवढं पाणी खेळाडूच्या रूममध्ये ओतलं

Updated: May 21, 2021, 12:51 PM IST
सचिन तेंडुलकरची खोडकर वृत्ती! या क्रिकेटपटूच्या रूममध्ये भरलं पाणी title=

मुंबई: खेळाडू आपल्या टीममेटसोबत अनेक गमतीजमती करत असतात. ग्राऊंड बाहेर देखील ते आपल्या टीममधील खेळाडूंसोबत अनेक मजेशीर गोष्टी करत असतात. सचिन तेंडुलकरची खोडकर वृत्ती सांगणार एक किस्सा समोर आला आहे. 

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी मिळून सहकाऱ्याची रूम पाण्याने भरून टाकली. सहकारी दमून भागून दुपारच्या वेळेत झोपला याचा फायदा घेऊन दोघांनी हा पराक्रमक केला. ही रूम होती सौरव गांगुली यांची. सौरव गांगुली यांनी हा किस्सा शेअर केला आहे. ती दुपारची घटना आयुष्यात कधीच विसरता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं.

'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान सौरव गांगुली यांनी हा किस्सा सांगितला आहे. गांगुली म्हणाले की, 'मी तेव्हा 14 वर्षांचा होतो. त्यावेळी इंदूर नॅशनल कॅम्पमध्ये वासू सर खूप सकाळी पळवायचे. त्यामुळे मी खूप थकलो होतो. दुपारी मला झोप लागली. रविवारची सुट्टी असल्यानं मी आणि माझा मित्र दोघंही झोपलो होतो.' 

कोट्यवधी रुपये दूरच पण या माजी क्रिकेटपटून 2 वेळचं अन्नही मिळायचे वांदे

'संध्याकाळी 5 वाजता जेव्हा जाग आली तेव्हा मी खडबडून जागा झालो. संपूर्ण रूममध्ये पाणी भरलं होतं. सूटकेस, बूट सगळं सामना पाण्यात तरंगत होतं. मला एक क्षण वाटलं की पाईप आतून फुटल्यानं इतकं रूममध्ये पाणी आलं.' 

'बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर तिथे पाणी नव्हतं. फक्त रूममध्येच गुडघाभर पाणी होतं. दार उघलं तेव्हा पाहिलं की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघंही गेटवर उभे होते. ते अजून माझ्या रूममध्ये पाणी ओतण्याच्या तयारीतच होते. मी त्यांना विचारलं दरवाजा नॉक करू शकत होतात. त्यावर सचिन बोलला की झोपू नको, खेळायला चल'

फलंदाजीआधी अंघोळ करण्याची अजब सवय पडली महागत...बॅटिंगचा टर्न चुकला आणि...

सौरव गांगुली यांनी सचिन तेंडुलकरबद्दल आणखी काही खुलासा केला आहे. सचिनला नेटमधून बाहेर खेचून आणावं लागायचं. तो फलंदाजीला उतरला की दुसऱ्या कोणाल येऊ करायची संधी मिळायची नाही. सचिन कोणते निर्णय कसे घेईल काय विचार करेल कशा पद्धतीनं खेळेल हे सगळं मला माहिती असायचं कारण मी त्याला खूप जवळून पाहिलं आहे.