२३ वर्षांपूर्वी आज सचिन तेंडूलकरने ठोकलं होतं पहिलं वन डे शतक

क्रिकेटचा देव मानला जाणार्‍या सचिन तेंडूलकर आणि त्याच्या फॅन्सचंही अतूट नातं आहे.

Updated: Sep 9, 2017, 11:44 AM IST
२३ वर्षांपूर्वी आज सचिन तेंडूलकरने ठोकलं होतं पहिलं वन डे शतक title=

मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणार्‍या सचिन तेंडूलकर आणि त्याच्या फॅन्सचंही अतूट नातं आहे.

सचिनच्या अनेक फॅन्सला त्याचे क्रिकेट विश्वातील सारे रेकॉर्ड्स अगदी तोंडपाठ आहेत. आज २३ वर्षांपूर्वी सचिन तेंडूलकरने इंटरनॅशनल वन डे  क्रिकेटमध्ये पहिले शतक ठोकलं होते. 

 

७८ सामन्यांनंतर सचिन तेंडूलकरने पहिले शतक ठोकले होते. श्रीलंकेमध्ये भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान सिंगर कपच्या सामन्यात सचिनने ११० धावा केल्या होत्या. वन डे इंटरनॅशनलमध्ये दुहेरी शतक ठोकणारा सचिन तेंडूलकर हा एकमेव खेळाडू आहे.  त्याने वनडे सामन्यांमध्ये एकूण १८४२६ धावा केल्या तर ४६३ सामने खेळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावांचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. 

वन डे सामन्यांमध्ये सचिन तेंडूलकरने ९६ अर्ध शतक ठोकली आहेत. २०१२ साली ढाका मध्ये भारत पाकिस्तान हा सचिनचा शेवटचा वनडे सामना होता. पाकिस्तान विरुद्ध १९८९ साली वन डे सामन्यामधूनच सचिनने इंटरनॅशनल  करियरची सुरूवात केली होती.  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं ठोकणाराही सचिन हा एकमेव खेळाडू आहे. कसोटी सामन्यात सचिनने ५१ शतकं ठोकली आहेत.