Rohit Sharma Statement, IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 209 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच चांदीची गदा उंचावली आहे. त्यामुळे आयसीसीच्या (ICC) सर्व ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलियाला पहिला संघ ठरला आहे. आजच्या सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या चेहऱ्यावर पराभवाची खंत दिसत होती. पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्याने खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
मला वाटलं नाणेफेक जिंकून आम्ही चांगली सुरुवात केली. पीचची परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियन संघला आम्ही फलंदाजीला उतरवण्यात आलं. पहिल्या सत्रात आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे मी निराश झालो आहे, असं कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला आहे.
ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनी खरोखरच चांगली कामगिरी केली. त्यामुळेच आम्ही सामन्यात बॅकफूटवर गेलो. दोघांनी चांगली फलंदाजी केली ज्यामुळे आम्ही सावध झालो. याचं श्रेय ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दिलं पाहिजं, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
The winning captain #WTC23 | #AUSvIND pic.twitter.com/1f9c2mxRP2
— ICC (@ICC) June 11, 2023
आम्हाला माहित होतं की अशा सामन्यांमध्ये पुनरागमन करणं नेहमीच कठीण असते, परंतु आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही शेवटपर्यंत लढलो. प्रामाणिकपणे दोन फायनल खेळणं ही आमच्यासाठी चांगली कामगिरी आहे पण आम्हाला या कामगिरीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे. इथं येऊन गेल्या दोन वर्षांत आम्ही जे काही केलं, त्याचं श्रेय तुम्ही घेऊ शकत नाही. संपूर्ण युनिटकडून उत्कृष्ट प्रयत्न झाला. हे दुर्दैव आहे की आम्ही पुढे जाऊन फायनल जिंकू शकलो नाही, असं म्हणत रोहित शर्माने नाराजी देखील व्यक्त केली आहे.
दरम्यान, सामन्याच्या पाचही दिवशी सामन्यावर कांगारूंचं वर्चस्व राहिलं. चौथ्या दिवसाच्या लंचनंतर टीम इंडियाने कमबॅक केल्याचं चित्र होतं. मात्र, भारतीय फलंदाजांना मैदानात पाय टिकवता आलं नाही आणि आयसीसी ट्रॉफीचा वनवास कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाकडून रोहितसेनेचा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.