रोहित-समायराचा हा क्यूट फोटो बघितलात का?

भारतीय टीमचा उपकर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा यशस्वी दौरा उरकल्यानंतर भारतात परताला आहे.

Updated: Feb 14, 2019, 06:24 PM IST
रोहित-समायराचा हा क्यूट फोटो बघितलात का? title=

मुंबई : भारतीय टीमचा उपकर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा यशस्वी दौरा उरकल्यानंतर भारतात परताला आहे. या दौऱ्यानंतर रोहित त्याची पत्नी रितीका सजदेह आणि मुलगी समायरासोबत सुट्टीची मजा घेतोय. डिसेंबरमध्ये रितीका सजदेहनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रोहित आणि रितिकानं त्यांच्या मुलीचं नाव समायरा ठेवलं आहे. समायराला छातीवर घेऊन झोपलेला असतानाचा एक फोटो रोहितनं ट्विटरवर शेअर केला आहे. 'हे खूप खास आहे. परत आल्यामुळे खूप चांगलं वाटत आहे', असं कॅप्शन रोहितनं या फोटोला दिलं आहे.

याआधी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनंही समायराचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये समायरा डोळे बंद करून हसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

दुसऱ्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा समायरासोबत खेळताना दिसत आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि रितीका सजदेहला टॅग करण्यात आलं आहे.

३० डिसेंबर २०१८ साली समायराचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात आला होता. मुलीला आणि पत्नीला भेटल्यानंतर रोहित परत ऑस्ट्रेलियाला गेला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

‪Well hello world! Let’s all have a great 2019 ‬

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

रोहित शर्मानं न्यूझीलंड दौऱ्यातील शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये भारताचं नेतृत्वही केलं होतं. टी-२० सीरिजमध्ये रोहितनं भारताकडून सर्वाधिक ८९ रन केले होते. या सीरिजमध्ये अर्धशतक करणारा रोहित एकमेव भारतीय बॅट्समन होता. या सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. या सीरिजमधली एकमेव मॅच भारत जिंकला, ज्यामध्ये रोहितनं अर्धशतक केलं होतं.

प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिलेल्या संकेतानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये रोहितला आराम दिला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. वर्ल्ड कप २०१९ आधी भारताची ही शेवटची सीरिज आहे. या सीरिजनंतर आयपीएल सुरु होईल, आणि यानंतर ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होईल.