ड्रेसिंग रूमध्ये बोलवून युवराज असं काय बोलला होता? 12 वर्षानंतर Rohit Sharma ला अजूनही आठवतो 'तो' क्षण!

Rohit Sharma remember Yuvraj singh statement : 2011 च्या वर्ल्ड कपवेळी मी काही वेळ उदास होतो. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी युवराज सिंहने ओळखली. युवराजने त्यावेळी मला त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलवलं अन्...

Updated: Aug 29, 2023, 12:11 PM IST
ड्रेसिंग रूमध्ये बोलवून युवराज असं काय बोलला होता? 12 वर्षानंतर Rohit Sharma ला अजूनही आठवतो 'तो' क्षण! title=
Rohit Sharma On Yuvraj Singh

Rohit Sharma On Yuvraj Singh : आशिया खंडाचा बादशाह कोण? याचा निर्णय देणाऱ्या आशिया कपला (Asia Cup 2023) आता फक्त काही तास शिल्लक आहे. आगामी वर्ल्ड कपची ही लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता रोहित सेना कसून तयारी करत असल्याचं दिसतंय. भारत आणि पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. येत्या 2 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मोठं वक्तव्य केलं आहे. 

नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?

कधी कधी स्वत:ला युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) जागी ठेवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा 2011 च्या वर्ल्ड कपसाठी माझ्या नावाची घोषणा झाली नव्हती. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. त्यामुळे मला माहितीये की, वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन न झाल्यावर कसं वाटतं... 2011 च्या वर्ल्ड कपवेळी मी काही वेळ उदास होतो. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी युवराज सिंहने ओळखली. युवराजने त्यावेळी मला त्याच्या रूममध्ये बोलवलं आणि मला डिनरला घेऊन गेला. त्यावेळी युवराजने मला मोलाचा सल्ला दिला. 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्याकडं अजूनही खूप वर्ष शिल्लक आहेत. आम्ही जेव्हा वर्ल्ड कप खेळत असू तेव्हा तू अजून मेहनत घेऊन संघात पुन्हा स्थान मिळवू शकतोस. मला वाटत नाही की, तुझ्यात काही कमी आहे, ज्यामुळे तु वर्ल्ड कप खेळू शकत नाही, युवीचे हे शब्द माझ्यासाठी मोलाचे ठरले', असं रोहित शर्मा सांगतो.

मला वाटत नाही की, एखादा निकाल किंवा एखादी चॅम्पियनशीप मला व्यक्ती म्हणून बदलू शकत नाही. गेल्या 16 वर्षात मी एक व्यक्ती म्हणून बदललो नाही आणि मला वाटत पण नाही की मी बदलावं.  येत्या दोन महिन्यांत मी स्वतःसाठी आणि टीमसाठी माझं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करेल. त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मात्र, मी दोन महिन्यात बदलेल, असं मला वाटत नाही, असं रोहित शर्मा म्हणतो.

आणखी वाचा - Virat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...'

दरम्यान, मी आता त्या स्टेजवर जाण्यास तयार आहे, जिथं मी 2019 च्या वर्ल्ड कपवेळी होतो. मी त्यावेळी चांगल्या मानसिकतेत खेळत होतो. तर त्यावेळी मी वर्ल्ड कपसाठी खास तयारी देखील केली होती. यावेळी देखील मी खास तयारी करून मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडे त्यासाठी वेळ देखील आहे, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. मी आणि माझा संघ प्रत्येकवेळी परफेक्ट आहे, असं होणार नाही. त्यामुळे आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू, असंही रोहित शर्मा आत्मविश्वासाने सांगतो.