Virat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...'

Virat Kohli On World Cup 2011 : 2011 च्या विश्वचषकादरम्यान सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया (Social Media)  नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.

Updated: Aug 29, 2023, 09:38 AM IST
Virat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...' title=
Virat Kohli Social Media Nightmare World Cup 2011

Virat Kohli On Social Media : टीम इंडियाचा रनमशिन म्हणजेच विराट कोहली (Virat Kohli) नेहमी मीडियापासून लांब असल्याचं दिसतो. तर सोशल माडियावर (Social Media) देखील विराट अॅक्टिव नसल्याचं दिसून येतं. अशातच आगामी वर्ल्ड कपमध्ये विराटची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकायचा असेल तर विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणं गरजेचं आहे. अशातच आता सोशल मीडियावर देखील विराट कोहलीची चर्चा होताना दिसत आहे. त्यावर आता विराट कोहलीने ट्रोल करणाऱ्यांना चपराक लगावली आहे. 

नेमकं काय म्हणाला विराट कोहली?

मला आठवतं की 2011 च्या विश्वचषकादरम्यान (World Cup 2011) सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे. मला माहित आहे की विश्वचषक जिंकण्यासाठी अपेक्षा आहेत. लोकांच्या भावना, उत्साह, परंतु हे जाणून घ्यायला हवं की खेळाडूंना इतर सर्वांपेक्षा जिंकण्य़ाची इच्छा जास्त असते. प्रत्येकाला वाटतं, अनेकांच्या भावना असतात, की आपण वर्ल्ड कप जिंकावा, पण एका खेळाडूपेक्षा जास्त या भावना कोणीही समजू शकत नाही. मी सध्या त्या जागी योग्य माणूस असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे.

12 वर्षापूर्वी म्हणजेच 2011 साली ज्यावेळी भारतात वर्ल्ड कप खेळवला जात होता. त्यावेळी प्रेशर किती होतं. याचा अंदाज येणं खूप अवघड आहे. मी त्यावेळी 23 वर्षांचा होतो. आम्ही जिथं जिथं जात होतो, तिथं फक्त लोकं वर्ल्ड कपविषयी बोलायची. वर्ल्ड कप जिंका, असं लोकं म्हणत होती. त्यावेळी आमच्या सिनियर खेळाडूंवर देखील खुप प्रेशर होतं, असं विराट म्हणतो.

दरम्यान, संघातील सिनियर खेळाडूंचा रोल महत्त्वाचा असतो. संघातील सिनियर खेळाडू प्रेशर सांभाळण्याचं काम करतात. 2011 च्या वर्ल्ड कपवेळी देखील सिनियर खेळाडूंनी परिस्थिती सांभाळली. त्यानंतर जे विजयाचं सुख होतं, ते वेगळ्या प्रकारचं होतं. त्याच एक मॅजिक होतं, असं विराट कोहली म्हणतो.