Resignation Letter : नोकरीच्या ठिकाणी करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी न मिळाल्यास किंवा अगदी पगारवाढीला वाव न मिळाल्यास न नोकरी बदलत एखाद्या चांगल्या संधीची निवड करण्याकडे अनेकांचाच कल दिसून येतो. काही कर्मचारी राजीनाम्यात काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद करतात, काहीजण राजीनामा फक्त आणि फक्त औपचारिकता म्हणून लिहितात. दिल्लीतील एक कर्मचारी मात्र इथं अपवाद ठरला आहे.
या कर्मचाऱ्यानं राजीनाम्यामध्ये इतक्या गोष्टी नमूद केल्या आहेत की खुद्द मालकानं या राजीनाम्याच्या ईमेलचा एक स्क्रीनशॉट थेट सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दिल्लीस्थित एका उद्योजकानं त्यांच्याच कंपनीतील कर्मचाऱ्यानं HR विभागाला सुपूर्द केलेल्या राजीनाम्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केल आणि पाहता पाहता हा राजीनामा व्हायरल झाला.
इंजिनिअरगिंच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या इंजिनिअरसाहब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक ऋषभ सिंह यांनी X वर त्यांच्याच कर्मचाऱ्याचा राजीनामा व्हायरल केला आहे. Resignation असा मथळा असणाऱ्या या मेलमध्ये कर्मचाऱ्यानं आपल्या कामाचं स्वरुप, मिळणारा पगार याविषयी अतिशय मार्मिक शब्दांत भाष्य केलं असून, ही नोकरी आपण नेमके का सोडत आहोत याची कारणं मांडली आहेत. आपल्या पगाराप्रमाणं आशा, आकांक्षाही एकाच ठिकाणी स्थिर असून एका अर्थी गोठल्याच आहेत असं त्यानं या मेलमध्ये म्हटलं.
स्क्रीनशॉटमध्ये दिसत असल्यानुसार राहुल बैरवा असं या कर्मचाऱ्याचं नाव. तो लिहितो,
'Dear HR, iQOO13 प्री बुक करायचा होता पण, दोन वर्षांचं कमालीचं समर्पण आणि प्रचंड मेहनतीनंतर मला असं दिसतंय की, माझ्या बढती आणि आशा आकांक्षांप्रमाणंच माझा पगारही गोठला आहे. मला खरंच 5 डिसेंबरला 51999 रुपयांच्या या पगारात ते शक्य नाही.
भारतातील सर्वात वेगवान फोन घेता येत नसेल, तर या पगारात माझं करिअर मी वेगानं कसं पुढे नेईन, याचीच चिंता मला वाटत आहे. त्याचमुळं मी ठरवलं आहे की, एका अशा ठिकाणी संधी शोधायची जिथं, करिअरमधील प्रगती हा फक्त एक फुकाचा शब्द नसेल.'
One of the finest reason for Resignation pic.twitter.com/0Gwtpcxxje
— Rishabh Singh (@merishabh_singh) January 7, 2025
आपल्या कार्यालयीन अखेरच्या दिवसाची तारीख नमूद करत या कर्मचाऱ्यानं नोकरीला आपण रामराम करण्याचा निर्णय नेमका का घेतला हे त्यानं फार मोजक्या शब्दांमध्ये स्पष्ट केलं. या राजीनाम्याविषयी तुम्ही काय म्हणाल?