Rohit Sharma : वडापाव नाही निदान समोसा तरी...; विकेटनंतर प्रेक्षकांसोबत बसून समोसा खाऊ लागला हिटमॅन?

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या फोटोओमध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसून येतोय.

Updated: Mar 11, 2023, 04:00 PM IST
Rohit Sharma : वडापाव नाही निदान समोसा तरी...; विकेटनंतर प्रेक्षकांसोबत बसून समोसा खाऊ लागला हिटमॅन? title=

Rohit Sharma Samosa Photo: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील शेवटचा आणि चौथा सामना अहमदाबादच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये तुफान फलंदाजी केली, मात्र भारतीय फलंदाजांनी देखील पहिल्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी केली. अशातच सोशल मीडियावर टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक फोटो व्हायरल होत असल्याचा दावा केला जातोय.

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या फोटोओमध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसून येतोय. मात्र या फोटोमागील नेमकं सत्य काय आहे, जाणून घेऊया. 

आऊट झाल्यानंतर दर्शकांमध्ये बसला होता रोहित?

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा, रोहित शर्मा मोठी खेळी करेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र हिटमॅन अवघ्या 35 रन्सवर माघारी परतला. रोहितची विकेट गेल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये रोहित प्रेक्षकांमध्ये जाऊन समोसा खाताना दिसतोय.

हा व्यक्ती रोहित नव्हे!

दरम्यान या फोटोमध्ये दिसत असलेला व्यक्ती रोहित शर्मा (Rohit Sharma) नसून त्याचा चाहता आहे. त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma Samosa Photo) च्या नावाची जर्सी घातली आहे. आणि तो त्यांच्या चाहत्यांसोबत समोसा खाताना दिसतोय. याचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वांनी या चाहत्याला रोहित शर्मा समजलं. यानंतर चाहते रोहित शर्माची मस्करी करू लागले. 

यावेळी चाहत्यांनी वडापाव नाही तर समोसा तरी..., असा टोला रोहित शर्माला लगावला आहे.