IND VS AUS Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात झालेली तीन टेस्ट सामन्यांची टेस्ट सीरिज टीम इंडियाने गमावली असून 24 वर्षांत प्रथमच टीम इंडियाला (Team India) घरच्या मैदानावर व्हाईट वॉश मिळाला आहे. न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता रविवारी मुंबईत झालेला शेवटचा टेस्ट सामना सुद्धा जिंकला. त्यामुळे न्यूझीलंडने 3-0 ने आघाडी घेऊन भारताचा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला. आता भारताची पुढची टेस्ट सीरिज ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार असून पण या सीरिजमध्ये कॅप्टन रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत शंका आहे. रोहितने स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलीये.
न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकात टीम इंडियाची शेवटची टेस्ट सीरिज ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 5 टेस्ट सामने खेळले. यासाठी लवकरच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. 22 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे भारत - ऑस्ट्रेलिया सीरिजचा पहिला सामना पार पडेल. टीम इंडियाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जायचं असेल तर त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 टेस्ट सामने जिंकणं गरजेचं असणार आहे. मात्र असे असताना कॅप्टन रोहित शर्मा पर्थ टेस्ट सामन्यात उपलब्ध नसेल अशी माहिती मिळतेय. मुंबई टेस्टनंतर कॅप्टन रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यात रोहितला ऑस्ट्रेलिया सीरिजबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्याने सांगितले की, 'मला सध्या पर्थ टेस्ट सामन्यासाठी माझ्या उपलब्धतेबद्दल खात्री नाही'.
रोहित वैयक्तिक कारणांमुळे पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकतो. असं झाल्यास पहिल्या टेस्ट सामन्यात जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करू शकतो. तसेच रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरन हा यशस्वी जयस्वालसह सलामी फलंदाजीसाठी येऊ शकतो. मात्र, रोहितच्या अनुपस्थितीमुळे टीम कमकुवत होऊ शकते.
Rohit Sharma said, I m not sure about my availability for the Perth Test at the moment. pic.twitter.com/Hru92FscNS
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) November 3, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पहिली टेस्ट) - 22 ते 26 नोव्हेंबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरी टेस्ट) - 6 ते 10 डिसेंबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टेस्ट) - 14 ते 18 डिसेंबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथी टेस्ट) - 26 ते 30 डिसेंबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पाचवी टेस्ट) - 3 ते 7 जानेवारी 2025
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 2025 मध्ये होणार असून त्याकरता क्वालिफाय होण्यासाठी टीम इंडियाला 6 पैकी 4 सामने जिंकणं महत्वाचं होतं. यात न्यूझीलंड विरुद्ध एक आणि नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा समावेश होता. मात्र न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टेस्ट सामना गमावल्यावर भारताला आता WTC फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवण भारतासाठी तेवढं सोपं नसेल. आतापर्यंत बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड इत्यादीं विरुद्ध झालेलया टेस्ट सीरिज या भारतात खेळल्या गेल्या. मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. विदेशात टेस्ट सीरिज जिंकण्याचा टीम इंडियाचा इतिहास फार चांगला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी भारताची कसोटी लागणार आहे.