मुंबई : भारतीय ओपनर रोहित शर्माने हेमिल्टनमध्ये झालेल्या सामन्यात जबरदस्त खेळी करत भारतीय टीमला विजयी केलं. आजच्या या सामन्यात विजयाचं श्रेय नक्कीच रोहितला जातं. या सामन्यात त्याने ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण केले आहेत.
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन रोहित शर्माने ५६ रन पूर्ण करताच हा रेकॉर्ड बनवला. ओपनर म्हणून १० हजार रन करणारा तो भारतीय बॅट्समन ठरला आहे.
रोहितच्या आधी फक्त ३ भारतीय ओपनर बॅट्समनने ही कामगिरी केली आहे. यामध्ये दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि विरेंद्र सेहवाग यांची नावं आहेत. गावस्करने ओपनर म्हणून १२,२५८ रन, सेहवागने १६,११९ रन तर सचिनने सर्वाधिक १५३१० रन केले आहेत.
रोहितने या सामन्यात आपल्या करिअरमधील २० वं अर्धशतक ही पूर्ण केलं आहे. त्याने ४० बॉलमध्ये ६ सिक्स आणि ३ सिक्ससह ६५ रनची खेळी केली. सुपर ओव्हरमध्ये जबरदस्त खेळी करत रोहितने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
भारतीय टीमने सीरीजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. हेमिल्टन मध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने आधी टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.