रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही

R Ashwin Ind vs Aus Test : दिल्ली कसोटी (IND vs AUS 2nd Test) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी, अश्विनने (ravichandran ashwin) भारतासाठी 3 विकेट,तर जडेजाने  (ravindra jadeja) 7 विकेट घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर आटोपला. 

Updated: Feb 19, 2023, 04:55 PM IST
रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही title=

R Ashwin Ind vs Aus Test : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दूसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या रविंद्र जडेजा (ravindra jadeja) आणि रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) या स्पिनर जोडीने धुरळा उडवून दिला. या दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 113 धावांत गुडाळले.यामध्ये जडेजाने 7 तर आश्विनने 3 विकेट घेतल्या आहेत. आश्विनने हे 3 विकेट घेऊन मोठा विक्रम केला आहे. त्याने दिग्गज खेळाडूच्या पक्तीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्याच्य़ा या कामगिरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

700 विकेटचा आकडा गाठला

दिल्ली कसोटी (IND vs AUS 2nd Test) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी, अश्विनने (ravichandran ashwin) भारतासाठी 3 विकेट,तर जडेजाने  (ravindra jadeja) 7 विकेट घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर आटोपला. अश्विनने हे 3 विकेट घेऊन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 705 विकेटचा पल्ला गाठलाय. यासोबतच अश्विनने आपल्या कारकिर्दीत एक खास विक्रमही केला आहे.

 

हे ही वाचा : रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक 

 

रेकॉर्ड काय? 

दिल्ली कसोटीत अश्विनने (ravichandran ashwin) इतिहास रचला आहे. कारण 2000 नंतर पदार्पण करणारा अश्विन हा एकमेव भारतीय आहे, ज्याने 5,000 प्रथम श्रेणी धावा केल्या आणि 700 प्रथम श्रेणी विकेट घेण्यास यशस्वी ठरलाय. यासोबतच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा आणि 700 हून अधिक बळी घेण्याचा विक्रम करणारा अश्विन पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

'या' दिग्गजांच्या पक्तीत स्थान

अश्विनने (ravichandran ashwin) अशी कामगिरी करून भारतीय फिरकीपटू विनू मांकड, श्रीनिवासराघवन वेंकटराघवन, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. विनू मांकडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 हजार 591 धावा आणि 782 विकेट घेतल्या. तर तिकडे श्रीनिवासराघवन वेंकटराघवनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 हजरा 617 धावा आणि 1 हजार 390 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.कपिल देवने 11 हजार 356 धावा आणि 835 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5572 धावा आणि 1136 विकेट घेण्याचा विक्रम कुंबळेच्या नावावर आहे. तर अश्विनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा आणि 700 हून अधिक बळी घेतले आहे.  त्यामुळे तो पाचव्या स्थानी आहे. 

दरम्यान ऑस्ट्रेलियाने दिल्ली कसोटीत प्रथम फलंदाजी करून पहिल्या डावात  263 धावा केल्या होत्या. त्य़ानंतर अश्विनने (ravichandran ashwin) 37 आणि अक्षर पटेलने 74 धावांच्या जोरावर भारताला पहिल्या डावात 262 धावा करता आल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या स्पिनर जोडीने हाणून पाडला आणि त्यांना 113 धावात रोखले. यामध्ये जडेजाने 7 तर आश्विनने (ravichandran ashwin) 3 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला (IND vs AUS 2nd Test) 115 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 6 विकेट राखून हे लक्ष्य सहज पुर्ण केले.या विजयासह टीम इंडियाने 2-0ने मालिकेत आघाडी घेतली आहे.