Ravi Shastri On BCCI: गेल्या काही महिन्यांत क्रिकेटचा खेळखंडोबा झाल्याचं दिसून येतंय. बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) कार्यकाळ वादग्रस्त राहिला. एकीकडे विराट कोहलीच्या (Virat Kohli) कर्णधारपदाचा वाद उभा राहत होता. तर दुसरीकडे रवी शास्त्री (Ravi Shastri) लवकरच प्रशिक्षक पदावरून पायउतार होणार होते. त्यावेळी सौरव गांगुली यांच्यावर दादागिरी केल्याचे आरोप झाले होते. तर सिलेक्शन कमिटीच्या मीटिंगमध्ये (Selection Committee Meetings) बीसीसीआयचे अध्यक्ष ढवळाढवळ करत असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याचा एक फोटो देखील व्हायरल होत होता. अशातच हेच प्रकरण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
विराट कोहली, सचिव जय शाह, अध्यक्ष गांगुली यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर तत्कालिन बोर्ड अध्यक्षांनी आरोपाचं खंडन केलं होतं. अशातच रवी शास्त्री (Ravi Shastri Statement) यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी शास्त्री यांनी रोखठोक मत व्यक्त केलंय.
निवड समितीच्या मिटिंगवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले, मला याचा अनुभव अगदी शून्य आहे. मी 7 वर्षे संघासोबत राहिलो पण सेलेक्शन मिटिंगमध्ये कधीही फिरकलो नाही. मला निमंत्रणही दिलं गेलं नाही किंवा मला नियमानुसार जाऊ दिलं गेलं नाही, असं म्हणत रवी शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली.
बहुतांश वेळा प्रशिक्षक म्हणून तुम्ही खेळाडूंसोबत असता. तुम्ही या मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण किमान निवडकर्त्यांचं मत जाणून घेऊ शकता. पण ती मिटिंग कधी सुरू होते अन् कधी संपते याची मला अजिबात कल्पना नसायची, असं शास्त्री म्हणतात. त्याचवेळी, मी कल्पना होती की.. तब्बल 3 ते 4 वर्ष सेलेक्शन मीटिंगमध्ये ते लोकं उपस्थित होती, ज्यांना तिथं नसायला पाहिजे, असं म्हणत रवी शास्त्री यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रवी शास्त्री यांचा इशारा सौरव गांगुलीवर (Ravi Shastri On Sourav Ganguly) होता, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आणखी वाचा - Rohit Sharma ला 'हिटमॅन' नाव कसं पडलं? बर्थडे निमित्त जाणून घ्या रंजक किस्सा!
दरम्यान, राष्ट्रीय संघाची निवड करत असताना अध्यक्षांचा कोणताही हस्तक्षेप नसावा, असं बीसीसीआयच्या नियमावलीत लिहिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेला मान्यता दिली आहे. तर केवळ निमंत्रक म्हणून मिटिंगला उपस्थित राहण्याचा अधिकार फक्त मंडळाच्या सचिवांना आहे. त्यामुळे सौरव गांगुली यांनी त्यांच्या कार्यकाळात अधिकारांचा गैरवापर केला का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.