Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. येत्या 2 ऑगस्टपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. मात्र यापूर्वीच रोहित शर्मावर मोठा आरोप लावला जातोय. फोटोबाबत एडिट करून तो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप यावेळी हिटमॅनवर करण्यात येतोय. दरम्यान या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याची पुष्टी झी 24 तास करत नाही.
सोशल मीडियावर रोहित शर्माला ट्रोल करण्यात येतंय. यावेळी रोहितने एक फोटो एडिट करून तो पोस्ट केला असल्याचा आरोप करण्यात येतोय. हा आरोप रोहितवर तेव्हा करण्यात आला ज्यावेळी टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध टी-20 सिरीज जिंकली. यावेळी रोहित शर्माने सूर्यकुमार यादव आणि टी-20 टीमचं अभिनंदन केलं आहे.
रोहित शर्माने सोशल मीडियावर टी-20 सिरीजनंतर एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने टी-20 सेनेचं अभिनंदन केलं आहे. यावेळी रोहितच्या फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, परफेक्ट स्टार्ट वेल डन टीम.
जर टीम इंडियाचा फोटोवरून आरोप करण्यात आलेला नाही तर तर कोणत्या फो
Why go to gym when you can do photoshop
- Rohit Sharma pic.twitter.com/cTiefmRrpG— Abhinav (@TotalKohli) July 30, 2024
टोवरून रोहितवर आरोप होतोय? ज्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे तो फोटो रोहितचा आहे. हे नेमकं प्रकरणं काय आहे हे व्हायरल होत असलेल्या फोटोवरून तुमच्या लक्षात येईल. रोहितने स्वतः शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये रोहितचं पोट दिसत नाही. याउलट दुसरीकडे बीसीसीआयने शेअर केलेल्या याच फोटोत त्याचं पोट दिसून येतंय. स्वत:ला फीट दाखवण्यासाठी रोहितने फोटोशॉप करून एडिट केल्याचा केल्याचा आरोप आहे.
दरम्यान हा फोटो खरंच एडिट केला आहे का याची पुष्टी करू शकत नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे, रोहित शर्माला ट्रोल केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मात्र याचा काहीही फरक पडलेला दिसत नाही. रोहित चॅम्पियन कर्णधार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. रोहित शर्मासमोर आचा श्रीलंकेत वनडे सिरीज जिंकण्याचं आव्हान असणार आहे.