Hasan Ali : पाकिस्तानी क्रिकेट संघाची नव्या वर्षाची सुरुवात पराभवाने झाली आहे. कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाचा कसोटी सामन्यात पराभव केला. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये बाबर-रिझवानसारखे महत्त्वाचे खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हसन अली खूप संतापलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये हसन अली ऑस्ट्रेलियाच्या चाहत्याला तिखट प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
हा व्हिडीओ सिडनी कसोटीनंतरचा असल्याचे म्हटलं जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 8 विकेटने पराभूत केले होते. सामन्यानंतर हसन अली आणि एका चाहत्यामध्ये बाचाबाची झाली. या व्हिडिओमध्ये एका चाहत्याने हसन अलीची खिल्ली उडवली. त्यावर संतापलेल्या हसन अलीने ताबडतोब प्रत्युत्तर दिलं. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यानंतर हसन अली चाहत्यांना ऑटोग्राफ देण्यासाठी आला होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हसन अलीला फिल्डिंगवरुन टोमणे मारले. इकडे ये, मी तुला कॅच कसा पकडायचा ते शिकवतो, असे चाहत्याने हसन अलीला म्हटलं. चाहत्याचे हे विधान ऐकून हसन अलीली प्रचंड राग आला आणि त्याने लगेच उत्तर दिलं. 'ठीक आहे, इकडे ये, मला कोणाला कॅच पकडायला शिकवायचे आहे त्यांनी इकडे या,' असे हसन अली चाहत्यांना म्हणाला.
A Pakistani fan to Hasan Ali
"Let me teach you how to catch a ball."#PAKvsNZ #PakistanCricketTeam pic.twitter.com/ZOBHicClqC
— Anas Kamboh (@Akcricket3) January 7, 2024
दोन वर्षांपूर्वीसुद्धा हसन अलीला झेल सोडल्याबद्दल खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी देखील पाकिस्तानचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होता. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 2 षटकात 21 धावांची गरज होती. त्यानंतर शाहीन आफ्रिदीच्या 19व्या षटकात हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला. त्यानतंर मॅथ्यू वेडने स्वबळावर सामना जिंकला. तो क्षण आजही पाकिस्तानी चाहते विसरलेले नाहीत. या सामन्यातही हसन अलीला खराब फिल्डिंगवरुन चाहत्यांनी ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.
दरम्यान, डिसेंबर 2022 मध्येही हसन अलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो चाहत्यांवर संतापला होता आणि मारायला धावला. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अलीने सोडलेल्या झेलबद्दल चाहते चिडवत होते. त्यामुळे हसन अलीला इतका राग आला की मॅच सुरू असतानाच तो रागाच्या भरात त्या प्रेक्षकांना मारायला धावला.