PAK vs ENG : आश्चर्य! पाकिस्तानने फक्त 3.1 ओव्हरमध्ये इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय केला नावावर

PAK VS ENG 3rd Test : इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 112 धावांत आटोपली. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3.1 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले. 

पुजा पवार | Updated: Oct 26, 2024, 03:54 PM IST
PAK vs ENG : आश्चर्य! पाकिस्तानने फक्त 3.1 ओव्हरमध्ये इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय केला नावावर  title=
(Photo Credit : Social Media)

PAK VS ENG 3rd Test : रावलपिंडी येथे पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan VS England) यांच्यात टेस्ट तीन सामान्यांची सीरिज खेळवण्यात आली. यात पाकिस्तानच्या टीमने इंग्लंड विरुद्ध पहिला टेस्ट सामना गमावल्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. यासह पाकिस्तानने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी मिळवली. इंग्लंडने पहिल्या  इनिंगमध्ये 267 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानने पहिल्या इनिंगमध्ये 344 धावांचा स्कोअर उभा केला. यानंतर त्यांनी इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 112 धावांत आटोपली. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3.1 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले. 

पाकिस्तानने विजयाचे आव्हान अवघ्या 19 बॉलमध्ये पूर्ण केले. हे आव्हान पूर्ण करताना 14 धावांवर त्यांची पहिली विकेट पडली. पाकिस्तानचा फलंदाज सॅम अयूबला 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर अब्दुल्लाह शफीक आणि शान मसूद यांनी इंग्लंडला एकही विकेट न देता विजयाचे आव्हान पूर्ण केले. शफीक  5 धावा करून नाबाद झाला तर कर्णधार शान मसूदने 6 बॉलमध्ये 4 चौकार आणि एक षटकार करून नाबाद 23 धावा केल्या. 

हेही वाचा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार?

सामन्यात शोएब बशीरने षटकार लागवल्यावर पाकिस्तानचे सर्व खेळाडू आनंदात धावत आले. शान मसूदसाठी ही खूप मोठी गोष्ट होती कारण बांगलादेश विरुद्ध पराभव झाल्यावर त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्याच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. त्यामुळे इंग्लड विरुद्धची सीरिज पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाची होती. विशेष गोष्ट ही की या पाकिस्तानी संघात ना स्टार खेळाडू बाबर आझम होता आणि ना शाहीन अफरीदी आणि नसीम शाह सारखे खेळाडू होते. असे असताना सुद्धा पाकिस्तानने कमाल केली. 

इंग्लड विरुद्ध पाकिस्तानच्या या विषयाचे शिल्पकार नोमान अली आणि साजिद खान हे ठरले. दोघांनी पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लडच्या 10 विकेट्स घेतल्या. यात साजिदने 4 तर नोमानने 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा संघ अवघ्या 112 धावांवर ऑलआउट झाला. तर यात इंग्लडकडून जो रूटने 33 धावा केल्या होत्या.