India World Cup 2023 : आशिया कप, टी20 वर्ल्ड कपनंतर क्रिकेट फॅन्सना वनडे वर्ल्ड कपच वेध लागले आहे. त्यात या वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होणार असल्याने क्रिकेट फॅन्समध्ये उत्सुकता आहे.मात्र भारतीय क्रिकेट फॅन्सच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार नाही. यामागचे कारण म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) मधील वाद आहे.
2023 या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वकप होणार आहे. या विश्वकपची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागलीय. मात्र ही उत्सुकता फार काळ टिकणार नाही आहे. कारण टीम इंजियाचे यजमान धोक्यात सापडले आहे. यजमानपद धोक्यात येण्यामागचे कारण म्हणजे आयसीसी आणि बीसीसीआयमधला वाद आहे. हा वाद भारताच यजमानपद हिरावू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने बीसीसीआयला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून कर सूट देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. मात्र भारत सरकार कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमात अशी सूट देत नाही.2016 मध्ये जेव्हा भारताने T20 विश्वचषकाचे आयोजन केले होते, तेव्हाही हा वाद आयसीसी (ICC) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात झाला होता. त्यावेळी बीसीसीआयला भारत सरकारकडून ही सूट मिळू शकली नव्हती. त्यानंतर आयसीसीला त्यांच्या वाट्याचे 190 कोटी रुपये द्यावे लागले होते.
आयसीसी कार्यक्रमाचे आयोजन करणार्या देशांना आपल्या सरकारशी समन्वय साधून कर सूट देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करत असते. 2023 च्या वर्ल्ड कपसाठी देखील आयसीसीने असेच केले आहे. मात्र बीसीसीआय यासाठी तयार नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर अशी परिस्थिती उद्भवली तर बीसीसीआय आयसीसीविरोधात न्यायालयात जाऊ शकते. याशिवाय, जर कर समस्येचे निराकरण झाले नाही आणि आयसीसीला त्याचा हिस्सा मिळाला नाही, तर ते होस्ट बदलण्याचा देखील विचार करू शकतात.
दरम्यान आयसीसी आणि बीसीसीआय वादाचा फटका क्रिकेट फॅन्सना बसणार आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल.