बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडचा पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध खेळताना टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

Updated: Jun 9, 2017, 03:43 PM IST
बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडचा पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय title=

कार्डिफ : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध खेळताना टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

आज या दोन्ही संघाना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. मात्र या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाचे सेमीफायनलमधील भवितव्य मात्र इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर असणार आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील विजेत्या संघाला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.