मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand Cricket Team) टी -20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) आपला संघ जाहीर केला आहे. आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 साठी न्यूझीलंडने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ही मेगा स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, ज्याचे आयोजन बीसीसीआय करणार आहे.
स्टार क्रिकेटपटू केन विल्यमसन (Kane Williamson) न्यूझीलंड संघाचे (New Zealand) नेतृत्व करणार आहे. याशिवाय काइल जेमीसन (Kyle Jamieson), डेव्होन कॉन्वे (Devon Conway), मार्टिन गुप्टिल (Martin Guptill) यांनाही टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर टीम शिफर्ट (Tim Seifert) हा यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावेल.
हे 15 खेळाडू पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) टी -20 मालिकेतही सहभागी होतील. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे महान फलंदाज रॉस टेलर(Ross Taylor) यालान्यूझीलंडच्या टी -20 संघात स्थान मिळाले नाही. याशिवाय अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) यालाही संधी देण्यात आलेली नाही.
केन विल्यमसन (कर्नधार), टॉड एस्टले, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेव्होन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमीसन, डेरिल मिशेल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅन्टनर, टीम शिफर्ट (यष्टीरक्षक), ईश सोधी, टीम साउथी .