IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल! आता फलंदाजाने षटकार ठोकला तर असे होईल

 IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) जवळपास आता पुढच्या महिन्यात यूएईमध्ये पुन्हा एकदा ही लीग सुरु होणार आहे. दरम्यान, या लीगच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे.

Updated: Aug 10, 2021, 08:25 AM IST
IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल! आता फलंदाजाने षटकार ठोकला तर असे होईल title=

मुंबई : IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) जवळपास दोन वर्षांनी यावर्षी भारतात पुन्हा आयोजित करण्यात आली. परंतु कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात असा उद्रेक पसरला की ही लीग मध्यंतरी थांबवावी लागली. आता पुढच्या महिन्यात यूएईमध्ये पुन्हा एकदा ही लीग सुरु होणार आहे. दरम्यान, या लीगच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे.

आयपीएलने नियम केले कडक 

यावर्षी भारतात आयोजित आयपीएल दरम्यान, अनेक खेळाडू आणि कर्मचारी कोरोना विषाणूची लागण झाली होती. आता ही लीग पुन्हा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्साइड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, जर यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये चेंडू स्टँडवर गेला तर त्याच्या जागी दुसरा चेंडू वापरला जाईल.

गोलंदाज चेंडूला थुकी लावू शकणार नाहीत

पूर्वी प्रमाणे, गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी थुकीचा वापर करत होते. आता त्यांना ते करता येणार नाही. जर त्याने तसे केले तर पंच त्याला इशारा देतील.जर त्याने हे वारंवार केले तर दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा मिळतील.

ये आहेत नवीन नियम  

यूएईला जाण्यापूर्वी, सर्व खेळाडू आणि त्यांचे कर्मचारी कोविड -19 शी संबंधित आरटी-पीसीआर चाचणी करुन घेतील. ही चाचणी 72 तासांपूर्वी केली पाहिजे. आरटी-पीसीआर चाचणीनंतर सर्व खेळाडू आणि कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येतील. एखाद्या खेळाडूला पूर्णपणे आवश्यक असतानाच बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाची परवानगी घ्यावी लागेल. बायोबबलमध्ये परत सामील होण्यासाठी, कोणताही खेळाडू आणि कर्मचारी यांना 6 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. या दरम्यान, त्यांची दर दुसऱ्या दिवशी चाचणी होईल आणि त्यांचा निकाल नकारात्मक असेल तरच त्यांना पुढे काहीही करण्याची परवानगी दिली जाईल.

आयपीएल 17 सप्टेंबरपासून सुरू होणार

4 मे रोजी कोरोनामुळे आयपीएल 2021  (IPL 2021) पुढे ढकलण्यात आली होती, आता सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होईल आणि ऑक्टोबरमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना होईल. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने 17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत आणि अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळला जाऊ शकतो.