Chris Gayle : ना हरभजन ना आश्विन... ख्रिस गेल म्हणतो, 'या' खेळाडूने मला त्रास दिला!

Chris Gayle, IPL: गेल नावाच भूत बाटलीत बंद करायला कोणाला जमलेलं नाही. करियरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या बॉलला सिक्स मारून सुरवात करणाऱ्या ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलंय.

Updated: Feb 3, 2023, 04:23 PM IST
Chris Gayle : ना हरभजन ना आश्विन... ख्रिस गेल म्हणतो, 'या' खेळाडूने मला त्रास दिला! title=
Chris Gayle, IPL

Chris Gayle On Jasprit Bumrah: 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल (Chris Gayle) नावाचं वादळ मैदानात आलं की भल्या भल्या बॉलर्सची हवा टाईट होयची. गेल नावाच भूत बाटलीत बंद करायला कोणाला जमलेलं नाही. कोणताही बॉलर असो हा पठ्ठ्या उभ्या उभ्या बॉल टोलवायचा. इथं तिथं नाही, बॉल थेट मैदानाच्या बाहेर. क्रिकेटच्या जंगलातला सांड म्हणून त्याची खिल्ली देखील उडवली गेली. मात्र, गेल काय थांबला नाही. पायात रॉड असताना देखील पुन्हा मैदानात उतरला अन् 'गेल क्या चिज है', म्हणत मैदान पुन्हा मारलं. याच ख्रिस गेलने (Chris Gayle On Jasprit Bumrah) आता मोठं वक्तव्य केलंय. (Neither Harbhajan nor Ashwin Chris Gayle says Jasprit Bumrah bothered me in ipl latest sports news)

आयपीएलमध्ये खेळताना (chris gayle team) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore), कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) या संघांसाठी तो खेळला आहे. बाकीच्या सर्वच संघासाठी युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल कर्दनकाळ ठरलाय. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार (Most sixes in IPL history) ठोकणारा खेळाडू आहे. तर सर्वाधिक व्यक्तीगत धावसंख्या देखील त्याच्याच नावावर आहे. अशातच आता सर्वात जास्त त्रास देणारा खेळाडू कोण?, असा सवाल गेलला विचारण्यात आला होता.

काय म्हणाला Chris Gayle?

आयपीएलने मला खुप काही दिलं. मला क्रिकेट खेळताना मजा देखील आली. नक्कीच मला बॉलर्सची धुलाई करायला आवडतं. याचं उत्तर देताना मी नक्कीच भज्जी (Harbhajan Singh) किंवा आश्विनसारख्या (R Ashwin) ऑफस्पिनरचं नाव घेणार नाही. मला सर्वाधिक त्रास देणारा खेळाडू राहिला तो जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah). त्याच्या बॉलिंगमध्ये विविधता दिसून येते. त्याची पद्धत देखील वेगळी आहे. त्यामुळे मी बुमराहची निवड करेल, असंही गेल म्हणालाय.

आणखी वाचा - तिसऱ्या टी20 नंतर टीम इंडियात राडा, ईशान किशाने शुभमन गिलला मारली कानाखाली, Video व्हायरल

दरम्यान, आयपीएलमधील (Chris Gayle IPL Record) 142 सामन्यात 4965 धावा केल्यात. स्ट्राईक रेट (Chris Gayle Strike Rate) तर विचारूच नका, 148.96. त्याचबरोबर 357 सिक्स गेलच्या नावावर आहे. एका सामन्यात अवघड पीचवर खेळताना गेल टिकून राहिला. पठ्ठ्यानं शतक (chris gayle t20 centuries) ठोकलं अन् बॅट हवेत उंचावली. त्यावर एक नाव लिहिलं होतं. 'युनिव्हर्स बॉस'...