Mumbai Indians IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सुरु होण्यासाठी अजून बराच दिवस बाकी आहेत. ऑक्शनच्या (IPL Aiction) नंतर अनेक टीममध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. यामध्ये प्रमुख टीम मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 16 वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या अरूण कुमार जगदीश (Jagadeesh Arunkumar) यांना सहाय्यक फलंदाजी कोच म्हणून नियुक्त केलं आहे.
डावखुरे ओपनल फलंदाज अरूण कुमार जगदीश यांनी 100 पेक्षा अधिक प्रथम श्रेणी क्रिकेट मधील सामने खेळले आहेत. त्यांनी 1993 ते 2008 या कालावधीमध्ये कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलं. क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर त्यांनी कर्नाटकसाठी फलंदाजी कोच म्हणून काम पाहिलं. यावेळी कर्नाटकने रणजी ट्रॉफी, ईरानी कप आणि विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. ते पॉंडीचेरी टीमते मुख्य कोच देखील होते, याशिवाय 2020 से अमेरीकेच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच देखील होते.
मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर टीमने आयकॉन आहे, तर महेला जयवर्धने मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीचे ग्लोबल हेड आहे. याशिवाय जहीर खानला ग्लोबल क्रिकेट डेव्हलपमेंट हेड बनवलं आहे. नुकतंच मार्क बाऊचर आता मुंबई इंडियन्सचे कोच असणार आहे. तसंच टीमसोबत शेन बॉन्ड बॉलिंग कोच आणि जेम्स पॅमेंट फील्डिंग कोच म्हणून काम बघतील.
रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेविड, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयूष चावला, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णु विनोद आणि राघव गोयल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) मध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन (Cameron Green) ला दुखापत झाली आहे. नुकतंच आयपीएलच्या ऑक्शनमध्ये कॅमरून ग्रीन (Cameron Green) ला 17.5 कोटी रूपयांमध्ये खरेदी केलं होतं. याच खेळाडूच्या हाताला आता गंभीर दुखापत झाली आहे.