What is DEXA: काय आहे डेक्सा टेस्ट जी भारतीय खेळाडूंसाठी केलीये बंधनकारक?

आता खेळाडूंचं सिलेक्शन हे यो-यो टेस्टसोबत डेक्सा (DEXA) टेस्टद्वारे होणार आहे. जर डेक्सा स्कॅनमध्यो कोणती समस्या उद्भवली तर त्या खेळाडूचं सिलेक्शन होणार नाही. 

Updated: Jan 2, 2023, 04:18 PM IST
What is DEXA: काय आहे डेक्सा टेस्ट जी भारतीय खेळाडूंसाठी केलीये बंधनकारक? title=

What is DEXA: टीम इंडियाला 2022 मध्ये जणू दुखापतींचं ग्रहण लागलं होतं. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), रोहित शर्मा (Rohit sharma) आणि रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना दुखापत झाली होती. गेल्या वर्षी बुमराह आणि जडेजा यांची कमतरता टीमला जाणवली. त्यामुळे एकंदरीत खेळाडूंच्या दुखापतीचा फटका टीम इंडियाला (Team India) बसलेला दिसला. आता भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (BCCI) ने खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

BCCI चा मोठा निर्णय

आता खेळाडूंचं सिलेक्शन हे यो-यो टेस्टसोबत डेक्सा (DEXA) टेस्टद्वारे होणार आहे. जर डेक्सा स्कॅनमध्यो कोणती समस्या उद्भवली तर त्या खेळाडूचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे आता भारतीय टीममध्ये एन्ट्री हवी असेल तर खेळाडूंना यो-यो टेस्टसोबत डेक्सा टेस्टही द्यावी लागणार आहे.

काय आहे DEXA टेस्ट?

डेक्सा ही एक प्रकारची बोन डेंसिटी टेस्ट आहे. या टेस्टच्या पूर्ण प्रोसेसमध्ये एक्स-रेचा वापर केला जातो. डेक्सा एक सेफ, वेदनाविरहित आणि लवकर पार पडणारी टेस्ट आहे. खेळाडूंची हाडं किती मजबूत आहेत, हे जाणून घेणं या टेस्टमागील उद्देश आहे. या टेस्टमध्ये 2 प्रकारची beam असतात. यात एकामध्ये बीमची उर्जा खूप हाय असते, तर दुसऱ्या बीमची उर्जा लो असते. हे दोन्ही beam हाडांमध्ये जाऊन एक्स-रे काढते. ज्यामुळे हाडांची मजबूतता लक्षात येण्यास मदत होते.

डेक्सा मशीनद्वारे ही संपूर्ण प्रकिया केली जाते. या स्कॅनच्या माध्यमातून जर फ्रॅक्चर होण्याची संभावना असेल तर समजू शकणार आहे. याशिवाय शरीरातील चरबीची टक्केवारी, वजन आणि टिश्यूंची देखील माहिती मिळू शकणार आहे. डेक्साचं दुसरं नाव बोन डेन्सिटी टेस्ट (बीडीटी) आहे. 

बैठकीत बीसीसीआयने घेतले मोठे निर्णय

  • अनेकदा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा टीम इंडियामध्ये समावेश केला जातो. मात्र आता असं होणार नाही. टीममध्ये निवड होण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे युवा खेळाडूंचं सिलेक्शन होणार आहे. 
  • यो-यो टेस्टशिवाय डेक्सा टेस्ट पास करणं आता बंधनकारक असणार आहे. या टेस्टमध्ये पास होणाऱ्या खेळाडूा टीममध्ये जागा दिली जाणार आहे.
  • आगामी दौरे आणि आगामी वनडे वर्ल्डकप पाहता एनसीएन आयपीएल टीमसोबत काम करणार आहे. यावेळी अशा खेळाडूंवर लक्ष ठेवले जाईल, जे आयपीएल 2023 चा भाग असतील.