धोनीला या गोलंदाजांची वाटत होती भीती, धोनीने केला खुलासा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची ओळख जगातील एक चांगला फलंदाज म्हणून आहे. तो जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर फिका असतो. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 8, 2017, 05:06 PM IST
धोनीला या गोलंदाजांची वाटत होती भीती, धोनीने केला खुलासा  title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची ओळख जगातील एक चांगला फलंदाज म्हणून आहे. तो जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा जगातील कोणताही गोलंदाज त्यांच्यासमोर फिका असतो. 

पण एक गोलंदाज असाही आहे की त्याचा सामना करताना धोनीला भीती वाटत होती. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय टीम विराट कोहली फाउंडेशनच्या आयोजित कार्यक्रमात धोनीने या गोष्टीचा खुलासा केला. 

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक एलन विलकिन्स याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला काही प्रश्न विचारले. विल्किन्सने धोनीला सर्वात प्रथम डकवर्थ लुईस नियमाबद्दल विचारले. त्यावर धोनी म्हणाला की आयसीसीलाही या नियमांबद्दल आणि ते कसे काम करतात याची संपूर्ण माहिती नाही. 

एलनने दुसरा प्रश्न विचारला की कोणत्या गोलंदाजाला खेळण्यात तुला अडचण होते. त्यावेळी धोनीने शोएब अख्तर याचे नाव घेतले. संपूण करिअरमध्ये शोएब अख्तरला खेळताना सर्वाधिक अडचण आली. 

शोएबला खेळताना अडचण झाली कारण तो खूप जलद गतीने चेंडू टाकत होता. तो यॉर्कर टाकायचा, बाउन्सर टाकायचा आणि अपेक्षा नसताना बीमरही फेकायचा.