मॅचविनर खेळाडूवर धोनीनं LIVE मॅचमध्ये असा काढला राग

धोनीचं जरा चुकलं का? ज्याने मॅच जिंकवली त्याच्यावरच संतापला

Updated: May 2, 2022, 01:36 PM IST
मॅचविनर खेळाडूवर धोनीनं LIVE मॅचमध्ये असा काढला राग  title=

मुंबई : हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात 13 धावांनी चेन्नईनं विजय मिळवला. या सामन्याचं नेतृत्व महेंद्रसिंह धोनीनं केलं. या सामन्यात ज्या खेळाडूनं सामना जिंकवून दिला. त्याच्यावरच महेंद्रसिंह धोनी चिडल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

चेन्नईनं या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली. लाईव्ह मॅचमध्ये धोनी खेळाडूवर संतापल्याचं पाहायला मिळालं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत.  

वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीवर धोनी संतापला होता. धोनीचा पारा चांगलाच चढला होता. त्याने मुकेशला खूप ऐकवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला 38 धावांची आवश्यकता होती. धोनीने मुकेशला बॉलिंगसाठी पाठवलं.

मुकेशने पहिल्याच दोन बॉलवर 10 धावा दिल्या. त्याने पुढे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. चौथा बॉल वाइड टाकला आणि हे सगळं झाल्यावर धोनी खूप जास्त संतापला. 

रागात धोनीने मुकेशला फिल्डिंगबाबत समजवलं आणि त्यानंतर बॉलिंग करायला सांगितली. या सगळ्या घटनेमुळे धोनी आणि मुकेश सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मुकेशने 46 धावा देऊन 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. चेन्नईचा संपूर्ण सामन्यात तिसरा विजय आहे.