शमी, हसीन जहाँचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; जामीनावर म्हणाली - 'त्याला' माझ्या वकिलाच्या पाया पडावं लागले

क्रिकेट मोहम्मद शमी याला  कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात अटरपूर्व जामीन मंजीर झाला आहे. यामुळे त्याला मोठा दिलासा मिळाला असला तरी पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Sep 20, 2023, 06:21 PM IST
शमी, हसीन जहाँचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; जामीनावर म्हणाली - 'त्याला' माझ्या वकिलाच्या पाया पडावं लागले  title=

Mohammed Shami Hasin Jahan Domestic Violence Case: क्रिकेटच्या मैदानात तुफान खेळी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या कौंटुबिक वादात अडकला आहे. त्याच्या वैवाहिक आयुष्यात आलेले वादळ खूप मोठं वादळ आलं आहे. थोडक्यात त्याची अटक टळली आहे. त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी खटला दाखल केला आहे. यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. मात्र, वनडे वर्ल्ड कपआधी त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

मोहम्मद शमीला अटकपूर्व जामीन मंजूर

मोहम्मद शमी याची  पूर्व पत्नी हसीन जहाँ हिने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी खटला दाखल केला आहे. या प्रकरणी कोलकाता कोर्टाने मोहम्मद शमी याचा जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी शमी आज कोर्टासमोर हजर झाला. यावेळी कोर्टाने 2 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन दिला आहे. शमीसोबतच त्याच्या मोठ्या भावालाही या प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला आहे. आशिया चषकापूर्वी 30 दिवसांच्या आत या प्रकरणात जामीन घेण्याचे आदेश कोर्टाने मोहम्मद शमीला दिले होते. जामीन मंजूर झाल्याने शमीची अटक टळली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे वनडे वर्ल्ड कपआधी शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

जामीन मंजूर झाल्यावर हसीन जहाँचे इंस्टाग्रामवर शमीवर गंभीर आरोप

कोर्टाने मोहम्मद शमी याचा जामीन मंजूर केल्यानंतर हसीन जहाँने इंस्टाग्रामवर लांब लचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे  हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप केले आहेत. जामीन मिळाला असला तरी शमीचा अभिमान धुळीस मिळाला आहे. शमीच्या वकिलाने  आपल्या अशिलाचे अर्थता त्याचे करिअर बरबाद होईल या भीतीने माझ्या वकिलाचे पाय धरले. शमीची शिफारस करण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची गर्दी जमवावी लागली. शमी अहमद आणि त्याचा भाऊ हसीब यांना कोर्टात हजर राहावे लागू नये म्हणून त्याने माझ्या वकिलाला पैसे देण्याचाही प्रयत्न केला असे गंभीर आरोप हसीन जहाँने केले आहेत. 

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही - हसीन जहाँ

इथे कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. एवढा मोठा क्रिकेटर, ज्याचे जगभरात नाव आहे. ज्याला मोठी  प्रसिद्धी आहे. तरीही काही काम झाले नाही. जामीन मिळवण्यासाठी शेवटी कोर्टातच यावे लागले ना. काही लोक स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात. भारतात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. भारतीय कायदा कोणालाही विकण्यासाठी नाही. हे शमीच्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे असं हसीन जहाँने पोस्टमध्ये म्हंटले आहे. शमीनी यातून बोध घ्यावा. अन्यथा भविष्यात खूप मोठा पश्चाताप होईल असा इशारा देखील तिने दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत शमी खेळणार आहे.