MI vs CSK, IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 7 गडी राखून पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना चेन्नईने 11 बॉल शिल्लक ठेवत लक्ष्य गाठलं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या चेन्नईने पराभव (MI vs CSK) केल्याने मुंबईचे फॅन्स नाराज असल्याचं दिसतंय. मुंबईच्या फलंदाजांनी नावाला साजेशी कामगिरी केली नाही. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील निराश असल्याचं दिसून आलं होतं. सलग दोन पराभवानंतर रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.
आजची खेळपट्टी चांगली होती, 30-40 धावा कमी होत्या आणि मधल्या षटकांचा फायदा घेता आला नाही. चेन्नईच्या फिरकीपटूंना श्रेय द्यावं लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला दडपणाखाली ठेवलं, असं म्हणत रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभवाचं कारण सांगितलं आहे.
आमच्याकडे काही तरुण मुले आहेत आणि त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. त्यांच्याकडे खरी प्रतिभा आहे आणि आम्हाला त्यांना पाठीशी घालायचे आहे आणि आम्ही करत असलेल्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला पाहिजे. वरिष्ठांनी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे, असं म्हणत रोहितने टीममधील वरिष्ठ खेळाडूंवर ताशेरे ओढले आहेत.
आम्ही 5 ट्रॉफी जिंकल्या असतानाही आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की गेल्या वर्षी आम्ही जिंकलोय. आपण चेंजरूममध्ये ज्या गोष्टी बोलतो ते सामन्यात काम करत नाहीत. आम्हाला माहित आहे की, गेल्या हंगामात आमचा खूप निराशाजनक होता, परंतु आम्ही नेहमी नव्याने सुरुवात करतो, असंही रोहित शर्मा (Rohit Sharma after loss 2 games) म्हणाला आहे.
Impact Player @RayuduAmbati with the winning runs
A -wicket win in Mumbai for @ChennaiIPL
Scorecard https://t.co/rSxD0lf5zJ#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/aK6Npl8auB
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
दरम्यान, हंगामातील दोन खेळ झाले आहेत, आम्ही बदलू शकत नाही. अर्थातच आपण चुकांमधून शिकू शकतो आणि मैदानावरील गोष्टी बदलण्यात अधिक धाडसी निर्णय घेऊ शकतो, असं म्हणत रोहितने आगामी सामन्यात संघात बदल होण्याबद्दल संकेत दिले आहेत.