VIDEO : या खेळाडूने केल्या 633 धावा, कोहलीला ही टाकलं मागे

कर्नाटकच्या एका फलंदाजाने नवा विक्रम रचला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 24, 2018, 08:15 PM IST
VIDEO : या खेळाडूने केल्या 633 धावा, कोहलीला ही टाकलं मागे  title=

मुंबई : कर्नाटकच्या एका फलंदाजाने नवा विक्रम रचला आहे. 

या क्रिकेटरने आपल्या घरच्या मैदानावर उत्तम प्रदर्शन केलं आहे. या क्रिकेटरचं नाव आहे मयंक अग्रवाल. कर्नाटकच्या या संघाने सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या संघाला विजय हजारे ट्रॉफी टूर्नामेंटमध्ये हरवलं. आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. 

मयंक अग्रवाल आणि करूण नायरच्या शानदार फलंदाजीमुळे कर्नाटकची टीम महाराष्ट्राला 9 विकेटने हरवलं आणि फायनलमध्ये शानदार प्रदर्शन केलं. यासोबतच मयंक अग्रवालने विजय हजारे ट्रॉफी टूर्नामेंटमध्ये एक नवा रेकॉर्ड रचला आहे. सर्वाधिक धावा करणारा हा रेकॉर्ड रचला आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा आणि विराट कोहली सारख्या खेळाडूंना मागे टाकलं आहे. 

मयंक अग्रवालने या खेळाडूंना टाकलं मागे 

633 धावा मयंक अग्रवाल 2018-19 
607 धावा दिनेश कार्तिक 2016-17
568 धावा श्रीवत्स गोस्वामी 2009-10
558 धावा अभिनव मुकुंद 2009-10 
536 धावा रॉबिन उथप्पा 2013-14 
534 धावा विराट कोहली 2008-09 

मयंक अग्रवालने विजय हजार ट्रॉफीमध्ये 7 सामन्यात 102 च्या रन रेटने 633 धावा केल्या आहेत. या अगोदरच्या रणजी ट्रॉफीत 8 मॅचमध्ये मयंक अग्रवालने 1160 धावा केल्या