GT vs PBKS IPL 2024 : पंजाबचा शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेटने विजय

GT vs PBKS Live Score, IPL 2024 : शिखर धवनसमोर आज शुभमनच्या टीमचं आव्हान, कोण मारणार बाजी?

GT vs PBKS IPL 2024 :  पंजाबचा शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेटने विजय

Gujarat Titans vs Punjab Kings Live Score in Marathi: आज  गुजरात विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये गुजरात vs पंजाब यांच्यातील आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 Apr 2024, 21:37 वाजता

उमेश यादवच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सचा कॅप्टन आणि धाकड फलंदाज शिखर धवन हा केवळ एक रन बनवून आऊट झाला आहे.

4 Apr 2024, 21:16 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्सने 199-4 च्या स्कोर पर्यंत पोहोचली आहे. गुजरातकडून शुभमन गिल हा फलंदाजीत हिरो ठरला आहे, गिलनं 48 बॉलमध्ये 89 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून गुजरातला चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवले आहे. गिलसोबत केन विलियम्सनने 26 तर, साई सुदर्शनने 33 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबकडून गोलंदाजीत कगिसो रबाडाने 2, हरप्रीत ब्रार 1 आणि हर्षल पटेलनेही 1 विकेट झटकली आहे. 

आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, पंजाबच्या दमदार फलंदाजीसमोर गुजरातची गोलंदाजी टिकते की नाही?

4 Apr 2024, 21:02 वाजता

17 व्या ओव्हरमध्ये कगिसो रबाडाने विजय शंकरला 8 धावांवर बाद करून तंबूत परत पाठवलं आहे. शंकरच्या विकेटनंतर राहूल तेवतिया फलंदाजीसाठी आला आहे.

4 Apr 2024, 20:42 वाजता

15 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिलने 31 बॉलमध्ये आपलं आर्धशतक पूर्ण केलं आहे. 15 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 134-3 असा आहे.

4 Apr 2024, 20:36 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या रूपात तिसरी विकेट गमावली आहे. साई सुदर्शन हा हर्षल पटेलच्या ओव्हरमध्ये 33 धावा बनवून कॅच आउट झाला.

4 Apr 2024, 20:17 वाजता

10 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातचा स्कोर 83-2 असा पोहोचला आहे. केनच्या विकेटमुळे साई सुदर्शन मैदामावर फलंदाजीसाठी आला आहे, तर शुभमन गिलने गुजरातची एक बाजू भक्कम पकडून ठेवली आहे, शुभमन गिल 29 धावांवर खेळत आहे. 

4 Apr 2024, 20:13 वाजता

पंजाबच्या कॅप्टनने हरप्रीत ब्रारला विकेटसाठी गोलंदाजीत परत आणलं होतं, आणि या आशेवर खरं उतरत हरप्रीतने 9 व्या ओव्हरीत केन विलियम्सनला 27 धावांवर बाद केलं आहे. 

4 Apr 2024, 19:54 वाजता

5 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 41-1 आहे. विलियमसन-गिल हे दोघं मैदानालर खेळत असून, गोलंदाजीत पंजाबच्या अर्शदीपच्या खात्यात एक विकेट आहे. 

4 Apr 2024, 19:45 वाजता

कगिसो रबाडाने चौथ्या ओव्हरीत चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असलेल्या ऋद्धिमान साहला 11 धावांवर बाद केलं आहे. पहिल्या विकेटनंतर केन विलियमसन मैदानात आला आहे.

4 Apr 2024, 19:02 वाजता

GT vs PBKS toss update : पंजाबचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

PBKS प्लेइंग 11 -

शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (W), प्रभसिमरन सिंग, सॅम करन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

GT प्लेइंग 11 - 

ऋद्धिमान साहा (WK), शुभमन गिल (C), साई सुदर्शन, केन विलियम्सन, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे