वाऱ्याच्या वेगाने शिकार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पेंचमधील थरारक Video

Leopard Attack Viral Video: नागपूरच्या पेंच जंगलात माकडाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. पेंचच्या जंगलात झाडावर बसलेल्या या माकडाला बिबट्याने शिकारीसाठी हेरलं होतं. त्यावेळीचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 21, 2024, 11:09 AM IST
वाऱ्याच्या वेगाने शिकार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पेंचमधील थरारक Video title=

Leopard Attack Viral Video: नागपूरच्या पेंच जंगलात माकडाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. पेंचच्या जंगलात झाडावर बसलेल्या या माकडाला बिबट्याने शिकारीसाठी हेरलं होतं. त्याचवेळी माकडाची नजर थोडीशी हटली आणि दबा धरून बसलेल्या या बिबट्याने झाडावर चढून माकडावर धडप घातली. माकडाच्या शिकारीची ही घटना जंगल सफारीवर आलेल्या पर्यटकांसमोर घडली. चिन्मय सालये या पर्यटकाने शिकारीचा हा थरार कॅमेरॅत कैद केलाय. 

ही बातमी आहे जंगला बिबट्यानं केलेल्या शिकारीची. नागपुरातल्या पेंचच्या जंगलात एका बिबट्यानं एका झेपेत झाडावर बसलेल्या वानराची शिकार केलीये. खरंतर जंगलात वाघ, बिबट्या आल्याची चाहुल सर्वात आधी माकडांनाच लागते. इतर प्राण्यांना तेच अलर्ट कॉल देतात. मात्र बिबट्या आला तरी एक वानर झाडावर बेसावध राहीलं. वानराची नजर हटली आणि बिबट्यानं संधी साधली. एका झेपेत बिबट्या झाडावर चढला आणि झडप घालून त्यानं बेसावध वानराची शिकार केली. बिबट्याच्या शिकारीचा हा थरार पेंचमधील पर्यटकांना पहायला मिळाला. मुंबईतले वन्यजीव प्रेमी सालये कुटुंबियांनी हा थरार कॅमेरॅत चित्रित केलाय. बिबट्यानं विद्युत वेगानं केलेला हा हल्ला पाहून सारेच चकित झाले. जंगलात जगायचं असेल तर प्रत्येकाला 24तास कसं अलर्ट रहावं लागतं याचा प्रत्ययच या पर्यटकांना आला.

प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल होतात. नागपुरच्या पेंजमधील हा व्हिडीओ तसाच आहे. अगदी वाऱ्याचा वेग धरत बिबट्याने ही शिकार केली. 60 मीटरवरुन बिबट्या झाडावर बसलेल्या माकडाला लक्ष करताना या कॅमेऱ्यात कैद झालाय. हा थरार कॅमेऱ्यात कैद झालं असून बिबट्याने रस्ता ओलांडत जवळ जवळ 20 फूट पेक्षा जास्त उचीवर असलेल्या माकडाची शिकार केली. 

नागपूर पेंच 

नागपूर पेंच हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. मध्यप्रदेशच्या सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यात स्थित असलेले हे राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यानाला मोगली जमीन म्हणतात. रुडयार्ड किपलिंगच्या भारतातील जंगलांवर अनेक कथा सांगितल्या जातात. 1965 मध्ये हे अभयारण्य घोषित करण्यात आले, 1975 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आणि 1992 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून नोंद करण्यात आला. 1983 मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.