GT vs PBKS IPL 2024 : पंजाबचा शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेटने विजय

GT vs PBKS Live Score, IPL 2024 : शिखर धवनसमोर आज शुभमनच्या टीमचं आव्हान, कोण मारणार बाजी?

GT vs PBKS IPL 2024 :  पंजाबचा शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेटने विजय

Gujarat Titans vs Punjab Kings Live Score in Marathi: आज  गुजरात विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये गुजरात vs पंजाब यांच्यातील आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 Apr 2024, 23:14 वाजता

शशांक सिंगच्या 61 धावांच्या दमदार खेळीमुळं, पंजाब किंग्सने हा सामना शेवटच्या ओव्हपमध्ये जिंकलेला आहे.

4 Apr 2024, 23:00 वाजता

पंजाबच्या शशांक सिंगने केवळ 22 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलयं

4 Apr 2024, 22:46 वाजता

राशिद खानच्या 16 व्या ओव्हरमध्ये शशांक सिंग हा 2 दमदार षटकार लावून बाद झाला आहे. शशांकच्या विकेटनंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आशुतोष शर्मा फलंदाजीसाठी आला आहे.

4 Apr 2024, 22:40 वाजता

15 व्या ओव्हरनंतर पंजाब किंग्स 138-5 या स्थितीत आहे. शशांक सिंग हा 48 वर खेळत असून त्याचा साथ पंजाबचा आणखी एक दमदार युवा खेळाडू जितेश शर्मा हा देत आहे.

4 Apr 2024, 22:30 वाजता

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने सिकंदर रजाला 15 धावांवर कॅच आउट केलं आहे. रजाच्या विकेटनंतर जितेश शर्मा हा मैदानावर आला आहे.

4 Apr 2024, 22:19 वाजता

10 ओव्हरनंतर पंजाब किंग्स 83-4 अशा स्थितीत आहे. शशांक सिंग हा 7 तर, सिकंदर रजा पण 7 धावांवर खेळत आहे. पंजाबला आता एक चांगल्या भागीदारीची गरज आहे.

4 Apr 2024, 22:12 वाजता

उमरजईच्या 9 व्या ओव्हरमध्ये सॅम करनने आपली विकेट गमावली आहे. करन हा जास्त मोठा स्कोर बनवण्यात अपयशी ठरला आणि केवळ 5 धावांवर बाद झाला.

4 Apr 2024, 22:04 वाजता

नूर अहमदने 8 व्या ओव्हरमध्ये परत एक विकेट घेतली आहे. प्रभसिमरन सिंगला नुरने 35 धावांवर बाद केलं आहे. चांगल्या टचमध्ये दिसत असलेल्या प्रभसिमरन सिंग हा कॅच आउट झाला.

4 Apr 2024, 21:56 वाजता

पावरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये नूर अहमदने पंजाबच्या जॉनी बेयरस्टोला 22 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर सॅम करन हा फलंदाजीसाठी आला आहे.

4 Apr 2024, 21:52 वाजता

5 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातचा स्कोर आहे 48-1, बेयरस्टो-प्रभसिमरन ची जोडी पंजाबच्या फलंदाजीला सांभाळत आहे. बेयरस्टो 22 तर प्रभसिमरन 24 वर खेळत आहे.