CSK vs SRH highlights IPL 2024 : हैदराबादने दिली चेन्नईला सहा विकेट्सने मात.

Headline: CSK vs SRH Live Score, IPL 2024 : ऋतुराज गायकवाडसमोर पॅट कमिंसचं आव्हान, कोण मारणार बाजी?

CSK vs SRH highlights IPL 2024 : हैदराबादने दिली चेन्नईला सहा विकेट्सने मात.

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Score in Marathi:  इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आज अठरावा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स आमने सामने असणार आहेत. 

5 Apr 2024, 20:47 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने आपल्या बॉलिंगवर सेट फलंदाज अजिंक्य रहाणेला 35 च्या स्कोर वर बाद केलं आहे. रहाणेच्या विकेटनंतर डॅरेल मिचेल फलंदाजीसाठी आला आहे.

5 Apr 2024, 20:42 वाजता

कमिंसच्या 14 व्या ओव्हरमध्ये चेन्नईने शिवम दुबेची महत्वपूर्ण विकेट गमावली आहे. शिवम दुबे हा ताबडतोब 45 धावा बनवून बाद झाला आहे.

5 Apr 2024, 20:10 वाजता

10 ओव्हरनंतर रहाणे-दुबेच्या भागीदारीने चेन्नईला चांगल्या स्थितीत आणलं आहे. दुबे 28 तर रहाणे 18 वर खेळत आहे. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर सीएसके 84-2 च्या स्थितीत आहे.

5 Apr 2024, 20:03 वाजता

शाहबाज नदीमने चेन्नईला मोठा धक्का दिला आहे. आठव्या ओव्हरमध्ये कॅप्टन ऋतुराजला बाद करत हैदराबादने सामन्यात पकड बनवली आहे.

5 Apr 2024, 19:49 वाजता

5 व्या ओव्हरनंतर चेन्नईकडून गायकवाड-रहाणेची जोडी फलंदाजीचे नेतृत्व करत आहे. पाचव्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईची स्थिती 33-1 अशी आहे.

5 Apr 2024, 19:45 वाजता

4 थ्या ओव्हरमध्ये नटराजनने रचिन रविंद्रची विकेट घेत त्याला 12 च्या स्कोरवर तंबूत परत पाठवलं आहे. चेन्नईच्या पहिल्या विकेट गेल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानावर आला आहे.

5 Apr 2024, 19:04 वाजता

SRH vs CSK toss update :  सनरायझर्स हैदराबादचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

SRH प्लेइंग 11 - 

अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन

CSK प्लेइंग 11 -

ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरेल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना

5 Apr 2024, 18:36 वाजता

आयपीएल 2024 च्या 18 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध खेळणार आहे.

या दोघं संघांच्या हेड-टू-हेड सामन्यांचा विचार केला तर. चेन्नई आणि हैदराबादने एकमेकांविरूद्ध एकूण 19 सामने खेळले आहेत, यातून चेन्नई सुपर किंग्सने आपले अविजयी वर्चस्व दाखवत हैदराबादला 14 सामन्यात पराभूत केलं आहे, तर हैदराबादने फक्त 5 सामन्यात चेन्नईला हरवलं आहे.