CSK vs SRH highlights IPL 2024 : हैदराबादने दिली चेन्नईला सहा विकेट्सने मात.

Headline: CSK vs SRH Live Score, IPL 2024 : ऋतुराज गायकवाडसमोर पॅट कमिंसचं आव्हान, कोण मारणार बाजी?

CSK vs SRH highlights IPL 2024 : हैदराबादने दिली चेन्नईला सहा विकेट्सने मात.

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Live Score in Marathi:  इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आज अठरावा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स आमने सामने असणार आहेत. 

5 Apr 2024, 22:51 वाजता

11 बॉल बाकी ठेवून सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला 6 विकेट्सनं एकतर्फी पराभूत केलं आहे. या विजयाने हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे.

5 Apr 2024, 22:37 वाजता

मोइन अलीने 16 व्या ओव्हरमध्ये शाहबाज अहमदला 16 व्या ओव्हरमध्ये बाद केलं आहे. अहमद हा आपल्या टीमसाठी एक उपयोगी खेळी खेळून बाद झालाय.

5 Apr 2024, 22:31 वाजता

15 ओव्हर नंतर सनरायझर्स हैदराबाद 135-3 अशा स्थितीत आहे. 5 ओव्हर बाकी असताना हैदराबादचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे, क्लासेन आणि अहमद हे दोघं फलंदाजी करत आहेत.

5 Apr 2024, 22:27 वाजता

मोईन अलीच्या 14 व्या ओव्हरीत एडन मारक्रमने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण त्याच ओव्हरमध्ये मोईनने मारक्रमला 50 धावांवर बाद केलं.

5 Apr 2024, 22:11 वाजता

10 ओव्हरनंतर हैदराबाद 107-2 अशी स्थिती आहे. महेश तिक्षणाच्या दहाव्या ओव्हरमध्ये सनरायझर्सने हेडची विकेट गमावलेली आहे. ट्रॅविस हेड हा 31 धावा करून बाद झाला.

5 Apr 2024, 21:47 वाजता

5 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर हैदराबादचा स्कोर 64-1 असा आहे. हेड 16 वर खेळत आहे, तर मारक्रमने पण 10 धावा बनवल्या आहेत

5 Apr 2024, 21:41 वाजता

अभिषेक शर्माच्या 37 धावांच्या तूफानी खेळीला दिपक चहरने तिसऱ्या ओव्हरमध्ये शांत केलं आहे. अभिषेकच्या विकेटनंतर एडन मारक्रम मैदानात आला आहे. 

5 Apr 2024, 21:17 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नई 5 विकेट गमावून 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. शिवम दुबे याने ताबडतोब 45 धावांची खेळी खेळलीय, रहाणेने 35 तर, गायकवाडने 26 धावांची खेळी खेळत चेन्नईला एका चांगल्या टोटलपर्यंत पोहोचवलं आहे. हैदराबादकडून गोलंदाजीत भूवनेश्वर, नटराजन, कमिंस, शाहबाज आणि उनाडकट या साऱ्या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली आहे. 

तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, हैदराबादच्या घातक फलंदाजीसमोर चेन्नईची गोलंदाजी टिकणार का?

5 Apr 2024, 20:51 वाजता

16 ओव्हरच्या समाप्तीनंतर सीएसकेचा स्कोर 132-4 असा आहे. मिचेल-जडेजाची धाकड जोडी मैदानावर खेळत आहे, येथून चेन्नईची मोठ्या लक्षावर नजर असेल.

5 Apr 2024, 20:47 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने आपल्या बॉलिंगवर सेट फलंदाज अजिंक्य रहाणेला 35 च्या स्कोर वर बाद केलं आहे. रहाणेच्या विकेटनंतर डॅरेल मिचेल फलंदाजीसाठी आला आहे.