Lionel Messi लाही BCCI ची भुरळ; टीम इंडियाला नाही तर जय शहांना पाठवलं सरप्राईज गिफ्ट, Photo व्हायरल

भारतात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते आहेतच, मात्र आता त्याचं भारतातील फॅन फोलोविंग अजून वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, लिओनेल मेस्सीने शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांना एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं आहे. 

Updated: Dec 24, 2022, 04:19 PM IST
Lionel Messi लाही BCCI ची भुरळ; टीम इंडियाला नाही तर जय शहांना पाठवलं सरप्राईज गिफ्ट, Photo व्हायरल title=

Lionel Messi sends Argentina jersey for Jay Shah : नुकताच कतारमध्ये फिफा वर्ल्डकप (Qatar FIFA World cup) पार पडला. तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटीनाने (Argentina) वर्ल्डकप जिंकला आणि कर्णधार लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण झालं. भारतात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते आहेतच, मात्र आता त्याचं भारतातील फॅन फोलोविंग अजून वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, लिओनेल मेस्सीने शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांना एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं आहे. हे गिफ्ट पाहून सर्व भारतीय मात्र हैराण झाले आहेत. 

भारताचा माजी स्पिनर प्रज्ञान ओझाने त्यांच्या इन्ट्राग्रामवर त्याचा आणि जय शहा यांचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्या दोघांनीही मेस्सीने सही केलेलं अर्जेंटीनाचं टी-शर्ट पकडलेलं दिसतंय. 

प्रज्ञान ओझाने पोस्ट केला फोटो

ओझाने हा फोटो पोस्ट करत त्यासाठी कॅप्शन लिहिलंय की, GOAT(लियोनेल मेस्सी) ने जय शहासाठी सही केलेली जर्सी आणि त्यासोबत शुभेच्छा पाठवल्या आहेत. हे किती उत्तम व्यक्तिमत्त्व आहे. मी आशा की, लवकरच मला माझ्यासाठी अशी जर्सी मिळेल.

ओझाची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. हा फोटो पाहून चाहते चांगलेच हैराण झाले आहेत, कारण मेस्सी जय शहासाठी त्याची सही केलेली जर्सी कशी पाठवू शकतो. या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.

रविवारी कतारमध्ये अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स यांच्यात फायनलचा सामना रंगला होता. अर्जेंटीनाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर शाह यांनी ट्विटरवर ट्विट करत लिहिलं होतं की, "फुटबॉल खेळ हा अविश्वसनिय आहे. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या आणि अखेर अर्जेंटीनाने तिसरा फिफा वर्ल्डकप जिंकला. हा एक चांगला विजय होता." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pragyan Ojha (@pragyanojha)

फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीनाचा विजय

सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटीनाने थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. तर अखेरीस अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.