Hardik Pandya Special Wishes to Team India : चार वर्षानंतर एकदा येणारी संधी आता टीम इंडियाच्या (Team India) नशिबात आली आहे. प्रत्येक सामन्यातील कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड कपचा (World Cup 2023) प्रवास सुरू ठेवला आणि आता हा प्रवास फायनलच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप उचलणार का? असा प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर टीम इंडियाला अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अशातच आता टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. वर्ल्ड कपमधील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या वनडे क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडला होता.
पोरांनो...मला या संघाचा जास्त अभिमान वाटू शकत नाही. आजवर आपण जे काही केले, किती पुढे आलो याचे श्रेय आपल्यामागे अनेक वर्षांच्या मेहनतीला आहे. आता आपण गौरवापासून एक पाऊल दूर आहोत. आपण लहानपणापासून स्वप्न पाहत होतो असं काहीतरी खास करण्यासाठीच... केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या मागे असलेल्या अब्जावधी लोकांसाठी वर्ल्ड कप उचला. माझं सर्व प्रेम आणि मनापासून मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. यंदा कप घरी आणूया. जय हिंद, असा व्हिडीओ मॅसेज हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी पाठवला आहे.
— hardik pandya (@hardikpandya7) November 18, 2023
वर्ल्ड कपसाठी जेव्हा टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली अन् टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. त्याच्याजागी प्रसिद्ध कृष्णाची निवड करण्यात आली होती. हार्दिकच्या दुखापतीनंतर टीम इंडियाचा पॅटर्नच बदलला.
दरम्यान, हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी एक उत्तम पर्यायी गोलंदाज होता. मात्र, जखमी झाल्यानंतर रोहितने टीमचं समीकरण बदललं. इशान किशनला संघाबाहेर बसवून रोहितने सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीला संघात स्थान दिलं. याचा फायदा टीम इंडियाला झाला. मोहम्मद शमीने फक्त सात सामन्यात धुरळा उडवला अन् 23 विकेट्स नावावर केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मात्र हार्दिक पांड्याची कमतरता टीम इंडियाला स्पष्ट जाणवली होती.