किदम्बी श्रीकांतला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे जेतेपद मिळवले. एकाच आठवड्यात त्याने सलग दुसरे सुपर सीरिज स्पर्धेचे जेतपद मिळवलेय.

Updated: Jun 25, 2017, 03:21 PM IST
किदम्बी श्रीकांतला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद title=

सिडनी : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे जेतेपद मिळवले. एकाच आठवड्यात त्याने सलग दुसरे सुपर सीरिज स्पर्धेचे जेतपद मिळवलेय.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकांतने ऑलिंपिक विजेता चेन लाँगला २२-२०, २१-१६ असे सरळ दोन गेममध्ये हरवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

पहिल्या गेममध्ये श्रीकांतले चेनने चांगली झुंज दिली. २०-२० असा बरोबरीत सामना झाल्यानंतर श्रींकातने सलग दोन गुण मिळवत पहिल्या गेममध्ये बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला चेनने थोडीफार लढत दिली. मात्र अखेरच्या क्षणी श्रीकांतने खेळ उंचावताना २१-१६ अशा फरकाने चेनवर मात केली. 

त्याचे आठवड्यातील सलग दुसरे जेतेपद आहे. गेल्या रविवारी त्याने इंडोनेशिया ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. एप्रिलमध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेत श्रीकांत फायनलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात श्रीकांतने इंडोनेशिया ओपन जिंकली. सुपर सीरिज स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचणारा  तो जगातील पाचवा खेळाडू ठरला होता.