सलग ७ अर्धशतके झळकावणारी मिताली ठरलीये पहिली क्रिकेटर

महिला वर्ल्डकपमध्ये भारताने आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी दिली. या विजयासह भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.

Updated: Jun 24, 2017, 10:47 PM IST
सलग ७ अर्धशतके झळकावणारी मिताली ठरलीये पहिली क्रिकेटर title=

नवी दिल्ली : महिला वर्ल्डकपमध्ये भारताने आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी दिली. या विजयासह भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.

या सामन्यात मितालीने शानदार अर्धशतक झळकावले. यासोबतच महिला क्रिकेटच्या इतिहासात तिने नाव रेकॉर्ड बनवला. मिताली राजने सलग सातव्या सामन्यात अर्धशतक झळकावलेय.

मितालीआधी एकालाही हा रेकॉर्ड करता आलेला नाहीये. सलग सात अर्धशतके झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरलीये. मिताली राजने गेल्या ७ वनडेत नाबाद ७०, ६४, नाबाद ७३, नाबाद ५१, ५४, नाबाद ६२ आणि नाबाद ५० धावांची खेळी केली.