मुंबई : 5 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट सिरिजला सुरूवात होत आहे.
बीसीसीआयने बुधवारी 16 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. यावेळी 17 वर्षाच्या जेमिमा रोड्रिग्जला देखील संधी मिळाली आहे. मुंबईत राहणारी ही जेमिमा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करून झाली आहे. रोहित शर्मा हा तिचा आवडता खेळाडू आहे.
जेमिमाने अगदी लहानवयातच खेळायला सुरूवात केली होती. मीडियाशी बोलताना तिने सांगितले की, मी बराच वेळ घरात बसून राहू शकत नव्हती. माझे दोन मोठे भाऊ असून ते जे काही करत तेच मला करण्यात अधिक रस होता. जेव्हा ते क्रिकेट खेळायचे तेव्हा मी त्यांना बघायचे आणि तेव्हाच मी ठरवलं् की मी देखील क्रिकेट खेळणार. त्यानंतर मी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला सकाळी 5 वाजता वांद्राच्या सँट एंड्यूजमध्ये जात असे. तिथे आम्ही 9 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत असे. आणि त्यानंतर 1 वाजता शाळेत जात असे.
जेमिमा क्रिकेटसोबतच हॉकीची देखील प्लेअर राहिली आहे. ती महाराष्ट्रमध्ये ज्युनिअर हॉकी टिममध्ये होती. मात्र स्कूल लेवलला मुंबईची वेगवेगळी टीम झाली आणि त्यामध्ये ती नव्हती. त्यानंतर तिने क्रिकेट खेळायचं ठरवलं.
जेमिमा ही अंडर 18 मध्ये महिला क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करणारी दुसरी भारतीय महिला आहे. यासोबतच एकदा तिने 178 धावा एकाच इनिंगमध्ये केले होते. जेमिमा प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये 1013 धावा आणि 19 विकेट आपल्या नावे केल्या आहेत.
जेमिमा आता मुंबई महिला अंडर 19 ची कॅप्टन आहे. जेमिमाच्या कॅप्टनशीपमध्ये मुंबईने अंडर 19 वनडे लीगमध्ये विजय मिळवला आहे.
17 वर्षाची ही भारतीय महिला टीममध्ये जेमिमा सर्वात लहान खेळाडू आहे. तिच्या पुढे मिताली राजचे नाव असून तिने 16 वर्षात इंटरनॅशनल टीममध्ये जागा निर्माण केली आहे.
दक्षि आफ्रिकेच्या विरूद्ध भारतीय महिला टीम तीन वन डे आणि तीन टी 20 मॅच खेळणार आहे. टीमची कॅप्टन असणार मिताली राज आणि हरमनप्रीत कौरही उप कॅप्टन असणार आहे.