Ishan Kishan : हे वागणं बरं नव्हं...; लाईव्ह सामन्यात वरिष्ठ खेळाडूला 'हे' काय बोलून गेला ईशान?

Ishan Kishan Sledging : टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील पहिल्या सामन्यात इशान किशन ( Ishan Kishan ) ने डेब्यू केलं. दरम्यान डेब्यूच्या सामन्यात ईशान किशनने एक कृत्य केलं असून चाहत्यांना मात्र ते रूचलं नाहीये. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 16, 2023, 06:25 PM IST
Ishan Kishan : हे वागणं बरं नव्हं...; लाईव्ह सामन्यात वरिष्ठ खेळाडूला 'हे' काय बोलून गेला ईशान? title=

Ishan Kishan Sledging : टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरील भारताने 1 इनिंग आणि 141 रन्सने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाकडून इशान किशन ( Ishan Kishan ) आणि यशस्वी जयस्वालने ( Yashasvi Jaiswal ) डेब्यू केलं. दरम्यान डेब्यूच्या सामन्यात ईशान किशनने एक कृत्य केलं असून चाहत्यांना मात्र ते रूचलं नाहीये. 

वरिष्ठ खेळाडूला केलं स्लेज

वेस्ट इंडिज फलंदाजी करत असताना इशान ( Ishan Kishan ) विकेटच्या मागे सतत काहीतरी बोलत होता. दरम्यान स्टंप माईकद्वारे सर्व काही ऐकू येत होते. यावेळी इशानने वरिष्ठ खेळाडू तसंच उपकर्णधार अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane ) तुलना वेस्ट इंडिजच्या 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजाशी केली. वेस्ट इंडिजचा 11 वा खेळाडू जोमेल वॉरिकन फलंदाजी करत होता. यावेळी त्याची विकेट पडत नसल्याने इशानने अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane ) स्लेज करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इशानची ही संपूर्ण घटना स्टंप माईकमध्ये कैद झालीये. 

ईशानने नेमकं काय केलं?

विकेटकिपींग करत असताना ईशानने रहाणेला म्हटलं की, तुझ्यापेक्षा जास्त बॉल खेळला हा अज्जू भाई...दरम्यान स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रहाणेला याबद्दल काही समजलं नसावं. इशानच्या वाक्यावर रहाणे फक्त, हो, का? इतकंच म्हणाला. दरम्यान या दोघांचं हे छोटसं संभाषण स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून ते सोशल मीडियावर आता व्हायरल होतंय.

पहिल्या सामन्यात रहाणेने चाहत्यांना केलं निराश

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरूद्ध उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final-2023) तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे रहाणे ( Ajinkya Rahane ) मोठी खेळी खेळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अजिंक्यला केवळ 3 रन्स करता आले. 

डेब्यू सामन्यात ईशानने केला 1 रन

पहिल्या टेस्ट सामन्यात इशानने विकेटकिपिंग करताना सर्वांचं मनोरंजन केलं. परंतु तो फलंदाजीत फारसे योगदान देऊ शकला नाही. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या इशानने आणि 20 बॉल्समध्ये 1 रन केला. त्याता एक रन काढून झाल्यावर रोहित शर्माने तातडीने डाव घोषित केला.