मुंबई : युवराज सिंग आणि त्याची पन्ती हेजल किच यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या रिलेशनशिपमध्ये ताण निर्माण झाला आहे. मात्र युवराज किंवा हेजल यांनी मात्र याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पण प्रत्येक पोस्ट आपल्या बायकोसोबत शेअर करणाऱ्या युवराज सिंगने २८ फेब्रुवारीनंतर बायकोसेबत एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. हे फक्त युवराजकडूनच होतंय असं नाही तर हेजलच्या इंस्टाग्राम पोस्टवरुनही १ मार्चनंतर युवराज गायब झालेला दिसून येतोय.
युवराज आणि हेजल किच यांची भेट २०११ मध्ये झाली. पण मैत्री होण्यास मात्र २०१४ हे साल उजाडावे लागले. त्यानंतर एक वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये दोघांचा बालीमध्ये साखरपुडा झाला. त्यानंतर २०१६ मध्ये पंजाबी पद्धतीने दोघेही विवाहबद्ध झाले. त्यानंतर सिख रितीरिवाजांनुसार दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडींगही केले. दिल्लीत युवी-हेजलच्या लग्नाचे रिसेप्शन झाले.
युवराज आणि हेजलच्या विवाहासाठी सागा वेडींग प्लानर्संना अपॉईंट करण्यात आले होते. तर आस्था जगवानी आणि अनमोल ज्वेलर्स यांची ज्वेलरी दोघांनी परिधान केली होती. विवाहसोहळ्यास अनेक दिग्गज सहभागी झाले होते. तर क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंनी विवाहसोहळ्यास उपस्थिती लावली होती.