IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. 2024 च्या वर्ष अखेरीस हे ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल. आयपीएल 2025 साठी केल्या जाणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक टीम त्यांचे किती खेळाडू रिटेन करू शकतात याविषयीची रिटेन्शन पॉलिसी लवकरच बीसीसीआयकडून जाहीर करण्यात येईल. शनिवारी बंगळुरू येथे आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग बंगळुरूमध्ये सुरु असून मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील 24 तासात म्हणजेच शनिवारी रात्री किंवा रविवारी रिटेन्शन नियमांची घोषणा केली जाऊ शकते.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग बंगळुरूमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार बंगळुरूच्या फोर सीजन्स हॉटेलमध्ये ही बैठक असून यात आयपीएलच्या रिटेन्शन नियमांवर अखेरचा निर्णय घेण्यात येईल. बीसीसीआयकडून या बैठकीचा निर्णय अचानकच घेण्यात आला असून सर्व फ्रेंचायझीला शुक्रवारी संध्याकाळी या बैठकीची माहिती देण्यात आली. रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की या बैठकीनंतर मेगा ऑक्शन रिटेन्शन नियमांची घोषणा केली जाऊ शकते.
गवर्निंग काउंसिल बैठकीत रिटेन्शन नियमांसोबतच मेगा ऑक्शनची तारीख आणि ठिकाण सुद्धा निश्चित केले जाऊ शकते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होऊ शकते. सौदी अरेबिया यंदा मेगा ऑक्शनचे यजमानपद भुषवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे गवर्निंग काउंसिलने बैठकीत मंजुरी दिली तर आयपीएल 2025 मेगा ऑक्शन सौदी अरेबिया येथे होऊ शकते. आयपीएल 2024 पूर्वी झालेले मिनी ऑक्शन सुद्धा दुबईत ठेवण्यात आले होते.
IPL RETENTION ANNOUNCEMENT IN 24 HOURS...
- IPL GC to meet today in Bengaluru to finalise retention rules. (Cricbuzz). pic.twitter.com/H52kpj1iIy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024
आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक टीमला त्यांचे 4 खेळाडू रिटेन करण्याची सवलत दिली जायची. यात टीमला 4 पैकी 3 भारतीय आणि एक विदेशी खेळाडू तर 2 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडू रिटेन करता यायचे. मात्र आता रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार यंदा बीसीसीआय प्रत्येक फ्रेंचायझीला प्रत्येकी 5 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देऊ शकते. ज्यात 3 भारतीय आणि 2 विदेश खेळाडूंचा समावेश असेल.