IPL 2024, MI vs LSG: यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (MI)च्या संघानं फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यात संघाचा पराभवाता पाढा पुन्हा गिरवला गेला आणि क्रिकेटरसिकांची आणखी एकदा निराशा झाली. शुक्रवारी लखनऊच्या संघाविरोधात खेळत असताना मुंबईच्या संघाच्या घरच्याच मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडिमवर 18 धावांनी पराभव झाला. एकिकडे संघ पराभूत झालेला असतानाच दुसरीकडे यंदाच्या वर्षी हार्दिक पांड्याच्या हाती गेलेल्या कर्णधारपदावरही टीकेची झोड उठवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
एकिकडे हार्दिक पांड्यावर टीका होत असतानाच दुसरीकडे बीसीसीआयनं त्याच्यावर कठोर कारवाई करत त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. शिवाय त्याला सामन्यात मिळणाऱ्या मानधनातील रकमेपैकी 30 टक्के रक्कम दंडस्वरुपात कापली जाणार आहे.
सामन्यादरम्यान कोड ऑफ कंडक्ट अर्थात सामन्यातील शिष्ठाचार मोडल्यामुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यता येत असल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिक 'स्लो ओवर रेट'साठी दोषी असल्याचं आढळलं असून, यंदाच्या पर्वात त्याच्याकडून हीच चूक तिसऱ्यांदा घडली, ज्यामुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. फक्त हार्दिकच नव्हे तर, इम्पॅक्ट प्लेअरसह संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असणाऱ्या इतर खेळाडूंनाही 12 लाखांचा दंड किंवा सामन्यातील मानधनाची 50 टक्के रक्कम दंड स्वरुपात भरावी लागणार आहे.
आखून दिलेल्या वेळेत लखनऊच्या संघाविरोधात खेळत असताना मुंबईच्या संघाला 20 ओवर पूर्ण करता आलया नाहीत. ज्यामुळं कर्णधार हार्दिक पांड्याला ही चूक महागात पडली आणि त्याच्यावर क्रिकेट नियामक मंडळाकडून कारवाई करम्यात आली. मुंबईच्या संघाचं आयपीएलमधील आवाहन संपुष्टात आल्यामुळं आता आयपीएलच्या पुढील पर्वातील पहिला सामना पांड्या खेळू शकणार नाहीय. थोडक्यात 2024 मध्ये मिळालेली शिक्षा त्याला 2025 मध्ये भोगावी लागणार आहे.
क्रिकेट नियमांनुसार एका संघानं 90 मिनिटांमध्ये 20 ओवर पूर्ण करणं अपेक्षित असतं. पण, असं करण्यात मुंबईचा संघ मात्र असमर्थ ठरला. यंदाच्या पर्वामध्ये मुंबईच्या संघानं लीग स्तरावरील सर्व 14 सामने खेळत अपयशानंच पर्वाचा शेवट केला. आता संघ पुढच्या हंगामात कशी कामगिरी करतो हाच प्रश्न क्रिकेटप्रेमी उपस्थित करत आहेत.