मिचेल स्टार्कची 'पैसा वसूल' कामगिरी, आयपीएलमध्ये इतिहास रचत गौतम गंभीरचा निर्णय ठरवला खरा

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकात नाईट रायडर्सने जेतेपद पटकापलं. कोलकाताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्कने दमदार कामगिरी करत नाव ठेवणाऱ्यांची तोंड बंद केलीत.

राजीव कासले | Updated: May 27, 2024, 04:35 PM IST
मिचेल स्टार्कची 'पैसा वसूल' कामगिरी, आयपीएलमध्ये इतिहास रचत गौतम गंभीरचा निर्णय ठरवला खरा title=

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या सुरुवातीपासून ते आयपीएलच्या शेवटच्या सामन्यापर्यंत  मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हे नाव चर्चेत होतं. आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटॉर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मिचेल स्टार्कवर 24 कोटी 75 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वोच्च बोली होती. एकाच खेळाडूसाठी इतके कोटी खर्च करण्याच्या गंभीरच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स मालक शाहरुख खाननेही गंभीरच्या निर्णयाला विरोध केला नाही. 

आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात मिचेल स्टार्कची कामगिरी पाहून गंभीरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. गंभीरचा निर्णय कसा चुकला हे सांगितलं जाऊ लागलं. इतकंच काय तर त्यावर मीम्सही तयार होऊ लागले. पण आयपीएलच्या शेवटच्या सामन्यानंतर स्टार्क आणि गंभीरवर टीका करणाऱ्यांची तोंड बंद झाली आहेत. पैसा वसूल कामगिरी काय असते ते मिचेल स्टार्कने दाखवून दिलंय. 

गौतम गंभीरच्या निर्णयाची जे खिल्ली उडवत होते, त्या सर्वांना मिचेल स्टार्कने कोलकाता नाईट रायडर्सला विजयी बनवत 24.75 कोटी रुपयांचा हिशोब सांगितला आहे. मोठ्या सामन्याचा खेळाडू काय असतो हे मिचेल स्टार्कने दाखवून दिलंय. मिचेल स्टार्कची सुरुवात निराशाजनक झाली पण शेवट मात्र त्याने दमदार केला.

क्वालिफायर 1 मध्ये प्लेअर ऑफ द मॅच
IPL 2024 मध्ये ग्रुप स्टेजच्या शेवटी-शेवटी मिचेल स्टार्क फॉर्मात आला होता. आणि जेव्हा प्ले ऑफचे सामने सुरु झाले तेव्हा तो आपल्या सर्वोत्तम फॉर्मध्ये परतला होता. क्वालिफायर 1 मध्ये मिचेल स्टार्कने 4 षटकात 34 धावा देत तीन विकेट घेतल्या. स्टार्कच्या कामगिरीच्या जोरावर कोलकाताने अंतिम सामन्याचं तिकिट पटकावलं. या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा तो मानकरी ठरला.

IPL 2024 के ग्रुप स्टेज मुकाबलों के खत्म होते-होते मिचेल स्टार अपनी लय में लौट चुके थे. और, जब प्लेऑफ मुकाबले शुरू हुए तो उनका बेस्ट निकलकर आया, IPL 2024 के प्लेऑफ में खेले क्वालिफायर 1 में मिचेल स्टार्क ने 4 ओवर में 34 रन देते हुए 3 विकेट लिए. इस प्रदर्शन के दम पर उन्होंने KKR को फाइनल का टिकट दिया और प्लेयर ऑफ द मैच बने.

अंतिम सामन्यातही प्लेअर ऑफ द मॅच
महत्त्वाच्या सामन्यात कशी कामगिरी करायची याचं उदाहरणच मिशेल स्टार्कने ठेवलं. मिशेल स्टार्कने हैदराबादला एका एका धावेसाठी रडवलं. पहिल्याच षटकात त्याने अभिषेक शर्माला क्लिन बोल्ड करत हैदराबादची हवा काढून टाकली. या सामन्यात स्टार्कने 3 षटकात 14 धावा देत 2 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळेच स्टार्क प्लेअर ऑफ द मॅच ठरला. 

स्टार्कने रचला इतिहास
मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. विराट कोहली सारख्या खेळाडूलाही जे जमलं नाही ते स्टार्कने करुन दाखवलंय. प्ले ऑफमध्ये दोन वेळा प्लेअर ऑफ मॅचचा खिताब पटकाणवारा आयपीएलच्या इतिहासतील तो पहिला खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्कने IPL 2024 मध्ये 14 सामन्यात 17 विकेट मिळवल्या.