IPL 2024 : देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची धूम सुरु आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यात शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knigh Riders) दमदार कामगिरी केली आहे. केकेआरने पाच सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला असून पॉईंटटेबलमध्ये (IPL Point Table) दुसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सने दमदार कामगिरी केली. आयपीएलच्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा z
केकेआर वि. लखनऊचा सामना पाहाण्यासाठी शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टेडिअमवर उपस्थित होता. त्याच्याबरोबर मुलगी सुहाना खान, मुलगा अबराम आणि अभिनेत्री अनन्या पांडेही उपस्थित होते. यादरम्यान स्टेडिअममधला शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
शाहरुच्या कृतीने मनं जिंकली
कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना रंगला होता. साहजिकच कोलकाता नाईट रायडर्सला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या अधिक होती. संपूर्ण स्टेडिअमभर केकेआरचे झेंडे झळकताना दिसत होते. केकेआरच्या खेळाडूंनीही आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. पण सामन्या संपल्यानंतर अनेक चाहत्यांनी आपल्या हातातले झेंडे स्टेडिअममध्येच टाकून दिले. शाहरुख खान ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी देखील अनेक झेंडे पडले होते. सामना संपल्यानंतर निघताना खाली पडलेले झेंडे शाहरुखने पाहिले आणि तात्काळ त्याने ते उचलण्यास सुरुवात केली. खाली पडलेले केकेआरचे झेंडे उचलून शाहरुखने आपल्या बॉडीगार्डकडे दिले.
यानंतर शाहरुख खानने स्टेडिअममधून आपल्या चाहत्यांना अभिवादन केलं. शाहरुखच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. शाहरुखच्या या व्हिडिओचं सोशल मीडियार चांगलंच कौतुक होत आहे. दरम्यान, सुहाना, अन्यना आणि अबरामने चांगलाच आनंद लुटला. केकेआरच्या विजायनंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कॅमेरात कैद झाला.
Shah Rukh Khan respects everything related to KKR. Collecting flags after the match all by himself..
Unbelievable down to earth guy #ShahRukhKhan pic.twitter.com/hIH1XHPDTE— 2.1.0 (@Revamped_SRKC) April 14, 2024
कोलकाताचा चौथा विजय
कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पहिली फलंदाजी घेतली. लखनऊने सात विकेटच्या मोबदल्यात 161 धावा केल्या. लखनऊतर्फे निकोलस पूरनने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर केकेआरच्या मिचेल स्टार्कने तीन विकेट घेतल्या. विजयानचं आव्हान केकेआरने अवघ्या 15.4 षटकात पूर्ण केलं. सलामीला आलेल्या फिल सॉल्टने 89 धावांची मॅच विनिंग खेळी केली.